आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन:लष्कराविरुद्ध बंड ,प्रथमच आयएसआय विरोधात नागरिक रस्त्यावर; प्रत्येक शहरांत उग्र निदर्शने

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर इस्लामाबाद शहरात लॉकडाऊन लावण्यात आले. शाळा आणि मदरसे बंद केले आहेत. यादरम्यान, गुरुवारी सुरू झालेले आंदोलन दुसऱ्या दिवशी उग्र झाले. पीटीआय समर्थकांनी अनेक शहरांत जाळपोळ केली. तर सामान्य नागरिकांनी लष्करी ठिकाणे व वाहनांवर हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच आयएसआय प्रमुखाविरोधात आंदोलन केले जात आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना इम्रान म्हणाले, ‘मला हल्ल्याबाबत आधीच माहीत होते. ते मला अयोग्य ठरवू पाहत आहेत.’ परवेज मुशर्रफ मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून पैसा देशाबाहेर घेऊन गेल्याचा आरोप करत इम्रान म्हणाले, त्यांची इंग्लंडच्या सर्वात महागड्या भागात ४ आलिशान घरे आहेत.

एक्स्पर्ट - सुशांत सरीन, वरिष्ठ सहकारी, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन

इम्रान बंपर लोकप्रियतेच्या लाटांवर स्वार, निवडणुकीत विजयाची शक्यता {पाकिस्तानात पुढे काय होईल? पाकिस्तानच्या भविष्याबाबत तूर्तास काही बोलणे अशक्य आहे. मात्र, तिथे प्रथमच लष्कर एखाद्या नेत्याला घाबरले आहे. इम्रान बंपर लोकप्रियतेच्या लाटांवर स्वार आहेत. त्यांना नव्याने निवडणूक हवी आहे. मात्र, सरकार, लष्कराची तशी इच्छा नाही. कारण इम्रान यांचा विजय जवळपास निश्चित आहे. {इम्रान यांनी लाँग मार्चची हीच वेळ का निवडली असावी? याच महिन्यात लष्करप्रमुख बाजवा निवृत्त होणार हे इम्रान यांना माहीत आहे. इम्रान समर्थक जनरल फैज हमीद आर्मी चीफ झाल्यास हा इम्रानसाठी सर्वात अनुकूल काळ असेल. लष्करातही काही अधिकारी इम्रान समर्थक आहेत. त्यामुळे इम्रान लष्कराचा दर्जा कमी करून पंजाब पोलिसांप्रमाणे करण्याची भीती लष्करातील इतर अधिकाऱ्यांना आहे. {निवडणुका घेण्याची आपली मागणी इम्रान पूर्ण करून घेतील? इम्रान लाँग मार्च व इतर आंदोलनांतून माघार घेणाऱ्यांपैकी नाहीत. ते आंदोलन आणखी तीव्र करतील. निवडणुका घेण्याशिवाय कोणताच पर्याय राहू नये, अशी स्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. घटनात्मकदृष्ट्याही राष्ट्रपती आरिफ अल्वी हे इम्रान यांनाच समर्थन देतील. {नवाज शरीफ सध्याच्या सरकारचे किती संकटमोचक ठरू शकतात? शाहबाज सरकार नवाज यांना पाकिस्तानात आणण्यासाठी तयार आहे. मात्र, नवाज यांच्यावरील खटले व कोर्टाच्या अनिश्चित भूमिकेमुळे सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे नवाज संकटमोचक ठरतील असे सध्या तरी वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...