आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • My Girlfriends Were Going To Join IS, I Didn’t Want To Be Left Behind Either; Now All Lost: Shamima Begum; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:माझ्या मैत्रिणी आयएसमध्ये सामील होण्यासाठी जात होत्या, मलाही मागे राहायचे नव्हते; आता सर्व गमावले : शमीमा बेगम

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी मैत्रिणींसोबत ब्रिटनहून पळाली, वृत्तचित्रात वास्तव सांगितले

अतिरेकी संघटना आयएसआयएसमध्ये (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) ती ‘आयएस वधू’ नावाने ओळखली जायची. नाव- शमीमा बेगम. २०१५ मध्ये फक्त १५ वर्षांची असताना इंग्लंडहून पळून सिरियात गेली. आयएसमध्ये सामील होण्यासाठी. का, कसे आणि कोणत्या स्थितीत, याचे उत्तर स्वत: शमीमा देते. ‘द रिटर्न : लाइफ आफ्टर आयएसआयएस’ डॉक्युमेंटरीत ती सांगते, त्या वेळी आयएसच्या कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होती. माझ्या दोन मैत्रिणी नोंदणी करत होत्या. मला मागे राहिलेली मैत्रीण व्हायचे नव्हते, म्हणून त्यांच्यासोबत गेले. शमीमा आता २१ वर्षांची आहे. आयएसच्या तावडीतून निघाली आहे.

उत्तर सिरियाच्या अल रोज शिबिरात राहते. ती सांगते, जेव्हा मी इंग्लंड सोडले, तेव्हा खूप लहान होते. सुटी लागली होती. मी माझ्या मैत्रिणींसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला माहीत होते की हा निर्णय आहे. मात्र तेव्हा निर्णय घेण्यास बाध्य असल्याचे जाणवले. मी फेब्रुवारी २०१५ मध्ये शाळेतील मैत्रिणी मीरा अबास आणि कादिजा सुलतानासोबत सिरियात गेले. तुर्कीमार्गे रक्कापर्यंत. मात्र तेथे मीरा आणि कादिजा बागहुज शहरात मारल्या गेल्या.

मैत्रिणी सोडून गेल्या. मी एकटीच राहिले. मला कुणीच मित्र नाही अशी जाणीव आता होते. त्याच माझे सर्वकाही होत्या. आता मी सर्वकाही गमावले आहे. आयएससोबतच्या गेल्या सहा वर्षांत मी तीन मुले गमावली. जेव्हा माझ्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हा स्वत:चा जीव घ्यावा असे वाटायचे. मी खूप एकटी पडले होते. मात्र काहीच करू शकत नव्हते.

सिरियाच्या शरणार्थी शिबिरात आढळली, तेव्हा ९ महिन्यांची गरोदर होती
फेब्रुवारी २०१९ मध्ये शमीमा सिरियातील अल-रोज शिबिरात आढळली होती, त्या वेळी ती ९ महिन्यांची गरोदर होती. ब्रिटन सोडण्याआधी शमीमा घरच्यांसोबत ईस्ट लंडनच्या बेथनाल ग्रीन भागात राहायची. तिचे आई-वडील बांगलादेशी आहेत. मात्र शमीमाचा जन्म इंग्लंडमध्येच झाला. मात्र सिरियात सापडल्यानंतर ब्रिटिश सरकारने तिचे नागरिकत्व रद्द केले आहे. फेब्रुवारी- २०२१ मध्ये इंग्लंडच्या सर्वाेच्च न्यायालयानेही तिला परत येण्याची परवानगी दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...