आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • My Mother Came To America From India And My Father From Jamaica; They Met During The Civil Rights Movement! First Speech By Kamala Harris, A Presidential Candidate From India

दिव्य मराठी विशेष:माझी आई भारतातून तर वडील जमैकातून अमेरिकेत आले होते; नागरी हक्क आंदाेलनात झाली होती त्यांची भेट; पराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार भारतवंशीय कमला हॅरिस यांचे पहिले भाषण

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • मुद्द्यांवर राजकारण: स्थलांतरितांची पाठराखण

भारतवंशीय खासदार कमला हॅरिस यांनी अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर पहिले भाषण दिले. हॅरिस विलमिंग्टन येथे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो. बायडेन यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. याप्रसंगी हॅरिस यांनी आई शामला गोपालन यांचे स्मरण केले. त्या म्हणाल्या, कठीण प्रसंगात हातावर हात ठेवून व तक्रारी करत बसण्याऐवजी परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी झटले पाहिजे, अशी आईची शिकवण होती. माझी आई आणि वडील जागतिक शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशांतून अमेरिकेत आले होते. आई भारत व वडील जमैकातून येथे आले. १९६० च्या दशकात नागरी हक्क आंदोलनाने दोघांना एकत्र आणले होते. न्यायासाठी संघर्ष आजही सुरू आहे. प्रगती करणे अमेरिकेतील प्रत्येक पिढीच्या हाती आहे. आपण सर्वांनी मिळून समान न्यायासाठी जीवन समर्पित केले.

मुद्द्यांवर राजकारण: स्थलांतरितांची पाठराखण

कमला हॅरिस यांनी वेळोवेळी वर्णभेदविरोधी आंदोलनांसह इतर मुद्द्यांवर आपले मत मांडले. त्यापैकी काही मुद्दे असे.

 • पोलिसांत परिवर्तन : हॅरिस यांनी अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर पोलिस व्यवस्थेत सुधारणा हवी या मुद्द्याचे समर्थन केले होते. आरोपीच्या मानेस पकडण्याच्या पद्धतीस विरोध होता.
 • स्थलांतरितांच्या समस्या : हॅरिस म्हणाल्या, अमेरिका स्थलांतरितांमुळे घडली. कारण काहीही असू शकते. पूर्वजांना बळजबरीने आणले असेल किंवा ते स्वेच्छेने येथे आलेले होते.
 • कृष्णवर्णीयांची चिंता : अमेरिकेत कृष्णवर्णीयांना माणसासारखी वागणूक दिली जात नाही. त्यामुळे ते विरोध करत आहेत. या परिस्थितीकडे दुर्लक्ष कसे करू शकतो?
 • गोळीबाराचा मुद्दा : विजयी झाल्यास बंदूक कायद्याच्या मंजुरीचा प्रयत्न करेल.
 • गर्भपात : हा महिलांचा वैयक्तिक अधिकार. कोणीही हस्तक्षेप करू नये.
 • आरोग्यसेवा : खासगी संस्था नियमांनी चालत नसतील तर मान्यता रद्द करावी.
 • शिक्षण : मुलांशी झालेल्या वर्तनावरून समाज कसा हे समजते. समाजाकडून मिळणारे प्रेम म्हणजेच शिक्षण असते.
बातम्या आणखी आहेत...