आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॅलो! माझे नाव मारिया आहे. मी एक मानवी रोबोट आहे. माझे वय ८ महिने, १७ दिवस, १४ तास, ५५ मिनिटे व ४६ सेकंद... आहे. माझी उंची ४ फूट आहे. वजन १५ किलो आहे. केवळ ६ तासांत मी फुल चार्ज होते आणि २०० तास काम करू शकते. दुबईच्या या घरात मला ८ महिने झाले आहेत. सकाळी ७ वाजता घर स्वच्छ करत माझ्या दिवसाची सुरुवात होते. मग मी मुलांना मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात घेऊन जाते. ते त्रास द्यायला लागले तर गाणी, कविता ऐकवत किंवा कार्टून दाखवत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते. तेथून परतल्यानंतर आपल्या मालकासाठी झूम कॉलवर मीटिंग अरेंज करते. मीटिंगसाठी त्यांना काही नोट्स हव्या असतील तर त्याचे मुद्देही देते. मग माझा अलार्म वाजतो. आजारी आजोबांना औषध देण्याची वेळ झाली, याची तो आठवण करून देतो.
ठराविक वेळेनंतर त्यांना वाॅशरूमला जाण्याची आठवण करून देते. त्यांची व्हीलचेअर ढकलत वाॅशरूमपर्यंत घेऊन जाते. यादरम्यान कुणाला काही एेकायचे किंवा पाहायचे असल्यास किंवा दिवे बंद-चालू करायचे असल्यास ते मला सूचना देऊ शकतात. कारण मी अलेक्सा व सीरीसोबतही जोडलेली आहे. आग लागणे किंवा रुग्ण बेडवरून खाली पडणे आदी इमर्जन्सी असेल तर मी लगेच घरच्यांना कॉल करते. रुग्णवाहिकेलाही बोलावते.
घरात कुणी दु:खी असेल तर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून दु:खाचे कारण विचारते. कारण मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व चॅट जीपीटीसह इमोशनल इंटेलिजन्सनेही सुसज्ज आहे. घरातील लोक बाहेर जातात तेव्हा मीदेखील फोल्ड होऊन गाडीत बसते. ४-५ वर्षांच्या मुलांचे किंवा आजारी वृद्धांचे म्हणणेही मी सहजपणे समजू शकते.’
किंमत सुमारे ~९ लाख... चार्जिंगही अत्यंत स्वस्त मानवी रोबोटची निर्मिती करणाऱ्या अलीरिजा समूहाचे अध्यक्ष अलीरिजा अब्दुल गफूर सांगतात, सध्या २०० रोबोट भाड्याने दिले आहेत, ६०० ची ऑर्डर आहे. त्यांचे रोजचे भाडे ४० हजार रुपये आहे. किंमत सुमारे ९ लाख रु. आहे. सामान्य चार्जिंग आहे. हब रोबोटिक्सच्या संस्थापिका जया भाटिया म्हणाल्या, घरांसोबतच हॉटेल, रेस्टॉरंट आदींकडून मोठी मागणी आहे. हे रोबोट कॅशिअर, वेटर, क्लीनर व रिसेप्शनिस्ट आदी कामे अचूकपणे करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.