आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:राष्ट्राध्यक्षपदावर राहण्यासाठी प्रसंगी कोणत्याही पातळीवर जाण्याची माझी तयारी : डोनाल्ड ट्रम्प

डेल्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोव्हेंबरमधील निवडणुकीत जो बायडेन यांना मिळालेय स्पष्ट बहुमत
  • जॉर्जियात निवडणूक निकाल पालटण्यासाठी केले आवाहन

अमेरिकेत २० जानेवारीला नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन शपथ घेतील. परंतु, निवडणुकीत पराभूत झालेले विद्यमान अध्यक्ष पद सोडण्यास तयार नाहीत, असे दिसते. किंबहुना निवडणूक निकाल पालटवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून ट्रम्प यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. डेमोक्रॅट्स आमच्यापासून व्हाइट हाऊस हिसकावू शकत नाहीत. आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. मग भले त्यासाठी कोणत्याही पातळीवर जायची आमची तयारी आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जॉर्जियाच्या डेल्टनमधील एका जाहीर सभेदरम्यान ट्रम्प यांनी बेधडकपणे हे वक्तव्य केले. येथे सिनेटसाठी मंगळवारी मतदान झाले. येथून दोन सदस्यांची निवड होणार आहे. परंतु सिनेटच्या विद्यमान संख्याबळावर सिनेटमधील बहुमत ठरणार आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन की बायडेन यांच्या डेमोक्रॅटला येथे विजय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळेच ट्रम्प डेल्टनच्या दौऱ्यावर होते. तेथील ट्रम्प यांच्या भाषणातून पराभवाची सल दिसून आली. त्यातच या आठवड्यात संसदेची बैठक होणार आहे. त्यात नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाची पुष्टी केली जाणार आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी जॉर्जियाचे प्रमुख निवडणूक अधिकारी ब्रॅड रॅफंस्पर्गर यांना फोन केला होता. ही बाब जाहीर झाली आहे. त्यात निवडणूक विजयासाठी ११,७८० हून जास्त मतांची व्यवस्था करण्यास सांगत असल्याचे ऐकायला मिळतात. त्यावरून वादंग वाढले आहे. ट्रम्प यांच्या अडेलतट्टूपणावर अनेक लोकांनी विरोध दर्शवला आहे.

ट्रम्प यांच्या विरोधात चौकशी करा, सदस्यांची मागणी
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहातील डेमोक्रॅटच्या सदस्यांनी ट्रम्प यांची केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. संस्थेचे प्रमुख क्रिस्टोफर रे यांच्याकडे ही विनंती करण्यात आली आहे. जॉर्जियाचे निवडणूक अधिकारी यांच्याशी फोनवरून दबाव टाकणारे संभाषण केल्या प्रकरणात फौजदारी चौकशीची मागणी करण्यात आली आहे

बातम्या आणखी आहेत...