आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Myammar Amry Crisis Updates: In India 14 Member Of Parlament And 2200 People Asylum; News And Live Updates

लष्करी तख्तपालट:म्यानमारच्या 14 खासदारांसह 2200 जणांना भारतात आश्रय

ऐझवाल9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नॉर्थ-ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनने केंद्र सरकारला एक आग्रह केला आहे

म्यानमारच्या १४ खासदारांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. लष्करी तख्तपालटानंतर मिझोराममध्ये आश्रय घेणाऱ्या २२२३ लोकांमध्ये या खासदारांचाही समावेश आहे. एक पोलिस अधिकारी म्हणाले, सर्व खासदार म्यानमारच्या चिन राज्य व सांगाग क्षेत्रातील आहेत. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या तिकिटावर नोव्हेंबर २०२० मध्ये ते विजयी झाले होते. सर्व स्थलांतरित मिझोरामच्या ऐझवालसह ९ जिल्ह्यांत राहतात. त्यात ८० टक्के पोलिस कर्मचारी आहेत.

इतर २० टक्के सरकारी अधिकारी, शिक्षक, अग्निशमन इत्यादींचा समावेश आहे. बहुतांश स्थलांतरितांच्या भोजनाची व्यवस्था एनजीआेने केली आहे. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनने केंद्र सरकारला एक आग्रह केला आहे. म्यानमारच्या स्थलांतरितांना पूर्वोत्तरमधील चार राज्यांत आश्रय देण्याची विनंती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...