आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दडपशाही:म्यानमार - डॉक्टरांवर लष्कर, पोलिसांचा कहर, आता आरोग्य कर्मचारी निशाण्यावर; विरोध केल्याने अनेक रुग्णालयांवर लष्कराचे नियंत्रण, लसीकरण थांबले

जकार्ताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैन्य तख्तपालटाविरोधात बोलणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला जातोय त्रास

म्यानमारमध्ये आता लष्कर व पोलिसांच्या निशाण्यावर आरोग्य कर्मचारी आहेत. त्यांना देशद्रोही वा बंडखोर म्हणून मारहाण केली जात आहे. रुग्णांवर उपचार सुरू असतानाही सेना व पोलिसांचे जवान रुग्णालयात घुसून डॉक्टरांना मारहाण करत आहेत. नर्सना लक्ष्य करत आहेत. डॉक्टर व नर्सेसवर कर्तव्य पार न पाडणे आणि देशद्रोहाचे खटले भरले जात आहेत. त्यांची हत्याही केली जात आहे. यामुळे कोरोनाचा सामना करणाऱ्या देशात लसीकरणही थांबले आहे. डॉक्टरांना बंदुकीच्या बटने मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ आले आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर अत्याचार होण्याचे कारण आहे लष्करी तख्तपालटाविरोधात त्यांनी केलेले आंदोलन. लष्कराने त्यांना बंडखोर म्हटले आहे. अशा ४०० डॉक्टर्स व १८० नर्सेसविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. जगभरात लढाईचे विश्लेषण करणाऱ्या इनसिक्युरिटी इनसाइटनुसार फेब्रुवारीपासून आतापर्यंत कमीत कमी १५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात ३२ जखमी झाले तर १२ ची हत्या झाली. जवळपास ५१ रुग्णालयांवर पूर्णपणे नियंत्रण करण्यात आले आहे. म्यानमारमध्ये २०१८ मध्ये प्रत्येक दहा हजार लोकांवर फक्त ६.७ डॉक्टर होते, तर २०१७ मध्ये जगात याची सरासरी १५.६ होती.

युद्धाचे शस्त्र म्हणून लक्ष्य करतेय सेना
म्यानमारचे लष्करी सरकार पूर्ण आरोग्य यंत्रणेला युद्धाचे शस्त्र म्हणून लक्ष्य करत आहे. यंगूनमध्ये अनेक दिवसांपासून लपून राहणाऱ्या डॉक्टराने सांगितले, रुग्णांवर उपचार करणे आमचे मानवीय व नैतिक काम असल्याचे आम्हाला माहिती आहे. त्यालाच गुन्हा ठरवले जाईल याचा विचारही केला नव्हता. त्यांनी लष्कराविरोधातील आंदोलनात जखमींवर उपचार केल्याने ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लष्कर व पोलिसांपासून लपले आहेत. ज्या रुग्णालयात ते उपचार करत होते तेथे लष्कर व पोलिसांनी एके दिवशी छापा टाकला होता. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना घेऊन गेले. हल्ल्यांमुळे लोकांच्या मनात लष्कराविरोधात संताप वाढला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर २४० हल्ले
डब्ल्यूएचआेनुसार जगभरात डाॅक्टर वा आरोग्य कर्मचाऱ्यांवर या वर्षी हल्ल्याच्या ५०८ घटना झाल्या. यात २४० हल्ले म्यानमारमध्ये झालेत. अमेरिकेतील फिजिशियन्स फॉर ह्यूमन राइट्सचे संचालक डॉ. राहा वाला यांनी सांगितले, हा त्या लोकांचा गट आहे जो म्यानमारमध्ये अनेक दशकांपासून मानवाधिकाराच्या उल्लंघनाविरोधात उभा आहे. जे योग्य आहे त्यासाठी उभे आहेत. लष्कर त्यांच्यावर अत्याचार करते.

बातम्या आणखी आहेत...