आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Myanmar Coup: State Counselor Aung San Suu Kyi And President Detained By Army After Emergency Declared, Phone And Internet Shutdown In Capital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्यानमारमध्ये तख्तपालट:10 वर्षांनंतर म्यानमारमध्ये पुन्हा लष्करी राजवट, आंग सान स्यू की यांची सत्ता उलथवली; एका वर्षाची आणीबाणी, सू कींसह राष्ट्रपती सुद्धा ताब्यात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाईल, इंटरनेट सेवा बंद; भारताने केले लोकशाही बहाल करण्याचे अपील

10 वर्षांपूर्वीच लोकशाहीचा उदय झालेल्या म्यानमारमध्ये पुन्हा लष्करशाही फोफावली आहे. देशातील लष्कराने सत्ता काबीज करून सोमवारी एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली. यासोबतच, लष्कराने सोमवारी सकाळीच स्टेट काउंसलर आंग सान सू की आणि राष्ट्रपती यू विन मिंट यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी व अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

म्यानमारच्या राष्ट्रीय माध्यमावर देशात लष्करी राजवट आल्याची घोषणा करण्यात आली आहे. यू मिंट यांनी आपल्या स्वाक्षरीसह त्यास मंजुरी करून सत्तेचे सर्व अधिकार कमांडर-इन-चीफ ऑफ डिफेंस सर्व्हिसेज मिन आंग ह्लाइंग यांच्या हातात सोपविले. देशातील पहिला उपराष्ट्रपती माइंट स्वे यांना काळजीवाहू राष्ट्रपती करण्यात आले आहे. याच दरम्या, आंग सान स्यू की यांच्या पक्षाने लष्करावर हुकूमशाही करून तख्तापालट केल्याचे आरोप करून सर्वांना याचा विरोध करण्याचे आवाहन केले.

देशता सत्ताधारी राहिलेल्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (NLD) चे प्रवक्ते म्यो न्यूंट यांनी चिनी वृत्तसंस्थेशी संवाद साधून या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. सोबतच, काउंसल स्यू की आणि राष्ट्रपतींना ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यांच्यासमवेत शान प्रांताचे व्यवस्थापन आणि अर्थमंत्री यू सो न्यूंट ल्विन, काया प्रांताचे NLD चेअरमन थंग टे आणि अय्यरवाडी प्रांतातील काही NLD खासदारांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाईल, इंटरनेट बंद
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजनाधानी नेपीतॉ येथे मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राजधानीसह प्रमुख शहरांमध्ये गर्दी आणि आंदोलन टाळण्यासाठी आधीच लष्कराला तैनात करण्यात आले आहे. देशातील इंटरनेट यंत्रणा सकाळी 8 वाजताच 50 टक्के बंद करण्यात आली होती.

भारताने केले लोकशाही बहाल करण्याचे आवाहन
भारताने म्यानमारच्या सत्तापालटवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, भारत सरकार म्यानमारच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या देशात पुन्हा लोकशाहीचे शासन बहाल करण्यात यावे असे अपील सुद्धा भारताकडून करण्यात आले आहे. तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह इतर देशांनी या घटनेचा विरोध केला. तसेच म्यानमारच्या नेत्यांची वेळीच सुटका करण्यात यावी अशी मागणी केली.

सत्तापालटनंतर लोकांनी दुकानांवर जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी केली
सत्तापालटनंतर लोकांनी दुकानांवर जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी केली

म्यानमारमध्ये 2011 पर्यंत लष्करी राजवट होती. कित्येक वर्षे नजरकैद असलेल्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांनी सुटका झाल्यानंतर त्यांनी लोकशाही सरकारमध्ये लष्कराचाही वाटा ठेवला. त्यांच्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला. सोबतच, स्यू की राष्ट्रपती निवडणूक लढवणार नाही असे राज्यघटनेत नमूद करण्यात आले. तरीही त्यांच्याच पक्षाने देशात सत्ता स्थापित केली. 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...