आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्यानमारमध्ये सैन्याने सत्ता मिळवून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. जुंता लष्करी राजवटीच्या विराेधात देशभरात सुप्त क्रांती दिसू लागली आहे. त्यासाठी संघर्ष करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळेच मंगळवारी बाजारपेठ बंद आणि आंदाेलक रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले.
त्यातून लष्करी राजवटीच्या विराेधातील असंताेष स्पष्टपणे दिसून आला. त्यात लाेकशाहीवादी समुदाय समाविष्ट झाला हाेता. गेल्या वर्षभरात जुंता सरकारच्या विराेधातील स्वर दडपण्यात जुंता सरकारला यश आलेले नाही. लाेकांनी रस्त्यावर उतरू नये, अशी सूचना करण्यात आली हाेती.
परंतु लाेक हजाराेंच्या संख्येने विराेधात उतरले हाेते. पाेलिसांनी अनेकांना अटक केली आहे. अटकेतील लाेकांवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातून बंडाचे निशाण स्पष्टपणे दिसून आले. वास्तविक जुंता सरकारने त्या आधी पत्रके वाटप करून आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले होते. त्याला लोकांना जुमानले नसल्याचे आंदोलनावरून दिसते.
कारण तरूण आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत फलक दाखवले. स्यू की यांच्या पक्षाच्या ध्वजाचा लाल रंग आंदोलकांनी रस्त्यावर टाकला होता. लोक दिवसभर घरात बसून होते. बाजारपेठ बंद होती. त्यातच अमेरिका, ब्रिटन, कॅनडाने म्यानमारवर निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
लष्कराच्या आवाहनानंतरही लोक घरात, बाजारपेठ बंद
समर्थकांना वनक्षेत्राचा आधार
जुंता सरकारच्या विराेधात कारवाईसाठी वन क्षेत्रातून प्रयत्न केले जात आहेत. लाेकशाही समर्थक माेठ्या संख्येने जंगलात दडून बसले आहेत. कयाह प्रांतातील लाेकांनी जुंता सरकारच्या विराेधात जाेरदारपणे आघाडी उघडली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
सू की यांच्याविराेधातील सुनावणी १४ फेब्रुवारीला
म्यानमारमधील लाेकशाही समर्थक आँग सान सू की यांच्याविराेधात निवडणुकीतील घाेटाळ्याचा खटला चालवला जात आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्तापालटानंतर झालेल्या निवडणूक घाेटाळ्यासाठी सू की यांना जबाबदार धरून जुंता सरकारने त्यांंना अटक केली हाेती.
उत्तरेत लाेकशाहीवाद्यांच्या ताब्यात सहा जिल्हे
उत्तर म्यानमारच्या सहा जिल्ह्यांत अजूनही लाेकशाहीवादी गटाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. जुंता सरकारला या प्रांताला ताब्यात घेता आलेले नाही. या सहा जिल्ह्यांत बंडखाेरांचा ताबा असल्याचे जुंता सैन्याने मान्य केले आहे.
५० हून जास्त जनसुरक्षा तुकड्या शहरात सक्रिय
लष्करी तज्ज्ञ अँथनी डेव्हिस म्हणाले, देशभरात सुमारे ५० हून जास्त जनसंरक्षण तुकड्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतेक शहरांत सक्रिय आहेत. सैन्य व पाेलिसांबद्दल गुप्त माहिती आंदाेलकांपर्यंत पाेहाेचवण्याचे काम या तुकड्या करतात. या तुकड्या पोलिस व लष्कराची दिशाभूल करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.