आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे संकट:न्यूयॉर्कमध्ये गूढ आजाराने 3 मुलांचा मृत्यू, देशात आतापर्यंत 100 रुग्ण, आजारी मुलांचे वय 2 ते 15 वर्षे

न्यूयाॅर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाशी लढाई सुरू असतानाच आणखी एका आजाराने नवा धोका

अँड्रयू जॅकब्स / अॅडगर सँडाेवल 

अमेरिकेतील न्यूयाॅर्कमध्ये गूढ आजाराने तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. येथे या आजाराचे ७३ रुग्ण आढळले. देशात आतापर्यंत अशा प्रकारचे सुमारे १०० रुग्ण आढळून आले आहेत. या आजारी मुलांचे वय २ ते १५ वर्षे आहे. गव्हर्नर अँड्रयू क्यूमाे यांनी यासंबंधीचा दुजाेरा दिला आहे. गूढ आजार झालेल्या बहुतांश मुलांमध्ये श्वासासंबंधीची लक्षणे दिसून आलेली नाहीत. मृत्यू झालेल्या मुलांमध्येही अशी लक्षणे नव्हती. आजाराचे कारण जाणून घेण्यासाठी न्यूयाॅर्क जीनाेम सेंटर व राॅकफेअर विद्यापीठ संयुक्त संशाेधन करत आहे. काेराेनामुळे मुलांचे जास्त मृत्यू झाले नाहीत, यावरून आतापर्यंत आई-वडिलांना दिलासा वाटत हाेता. परंतु नव्या गूढ आजाराने आई-वडिलांना अधिक दक्ष राहण्याची वेळ आहे. नवीन आजाराबद्दल क्यूमाे माध्यमांना माहिती देत हाेते. त्याचवेळी न्यूयाॅर्कमध्ये १० मुलांनी प्राण गमावल्याची बातमी आली. 

लक्षण : त्वचा, धमन्यांमध्ये सूज, दीर्घ ताप, पाेट-छातीत वेदना 

गूढ आजाराची काही लक्षणे आढळून येतात. त्यात रुग्णाची त्वचा व धमन्या सूजतात. कावासाकी आजारात दिसतात. डाेळ्यांत जळजळ. शरीरावर डाग, त्वचेचा रंग बदलणे. दीर्घकाळ ताप, पाेट-छातीत गंभीर वेदना,लाे ब्लड प्रेशरचाही त्रास होतो. 

उपचार : स्टेराॅइड, अॅस्पिरिनचा डाेस, गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले

अमेरिकेत डाॅक्टर रुग्णांना स्टेराॅइड, इन्ट्रावेनस, इम्युनाेग्लाेबुलिन, अॅस्पिरिन आैषधीचा डाेस दिला जात आहे. त्याशिवाय अँटिबायाेटिक्सही दिले जात आहे. गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. 

अंदाज : राेगप्रतिकारशक्ती विकसित हाेत नसल्याने मुले लक्ष्य

आराेग्य तज्ञांच्या मते, गूढ आजाराचा परिणाम लहान मुलांवर जास्त हाेत आहे. कारण त्यांच्यात राेगप्रतिकारशक्ती विकसित हाेत नाही. मुलांकडूनया आजाराचा प्रादुर्भाव कुटुंबाला हाेण्याची शक्यता आहे. आता डाॅक्टर जेनेटिक टेस्टवर भर देत आहेत. 

जग : ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंडमध्येही ५० रुग्ण

डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार गूढ आजार झालेले रुग्ण महिन्यापूर्वीपासून आढळून येत हाेते. गेल्या महिन्यात न्यूयाॅर्कच्या एका रुग्णालयात २५ मुलांना दाखल करण्यात आले हाेते. लुसियाना, मिसिसिपी, कॅलिफाेर्नियासह सात राज्यांत असे रुग्ण आढळले. एवढेच नव्हे तर युराेपीय देशांत ब्रिटन, फ्रान्स, स्वित्झर्लंड व इटलीत अशा गूढ आजाराने ५० पीडित लाेक आढळले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...