आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात भावुक निवृत्ती...:18 वर्षांपासून फेडररचा सर्वात मोठा स्पर्धक नदाल शेवटच्या सामन्यात जोडीदार...दोघांना अश्रू अनावर

लंडन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘खेळ भावने’चे सर्वात भावुक छायाचित्र पाहायचे असेल तर टेनिस जगतातील या दिग्गजांच्या डोळ्यात तरळलेल्या अश्रूकडे पाहा. निमित्त होते, रॉजर फेडररच्या करिअरच्या अखेरच्या सामन्याचे. यापेक्षाही रंजक बाब म्हणजे, त्याचा जोडीदार झाला तो कट्टर स्पर्धक राफेल नदाल. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा फेडररचा विक्रम मोडीत काढणारा हाच तो नदाल. शुक्रवारी रात्री सामना संपल्यावर दोघांचेही डोळे डबडबले. नदालने फेडररविरुद्धचा पहिला सामना २००४ मध्ये खेळला होता.

क्रिकेटपटू विराट कोहलीने हे छायाचित्र शेअर करत लिहिले की, दोन स्पर्धकांची भावना एकमेकांबाबत अशी असेल, असा कुणी विचार तरी केला होता का? हे सर्वात सुंदर खेळाचे चित्र आहे.’

...शेवटच्या सामन्यात झुलनही गहिवरली
भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने शनिवारी लॉर्ड्‌सवर करिअरचा शेवटचा सामना खेळला. कर्णधार हरमनप्रीत एवढी हळवी झाली की ती झुलनच्या गळ्यात पडून रडली...

झुलनने महिला क्रिकेटमध्ये विक्रमी ३५३ बळी घेतले. वनडेतही सर्वाधिक २५३ बळी घेतले.

२० वर्षे २६१ दिवसांचे करिअर. महिला वनडेत दुसरे सर्वाधिक आहे. - संबंधित स्पोर्ट्‌स