आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागालँडच्या मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात सैन्याच्या गोळीबारात ठार झालेल्या १४ ग्रामस्थांच्या कुटुंबीयांनी भरपाई स्वीकारण्यास नकार दिला. ते म्हणाले की, दोषी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सजा मिळेपर्यंत कोणतीही सरकारी भरपाई घेणार नाही. दोषींना कठड्यात आणले जावे. नागालँडमधून सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम (अफस्पा) अहवला जावा. ओटिंग ग्रामपंचायतीने म्हटले, ४ आणि ५ डिसेंबरला जेंव्हा स्थानिक लोक गोळीबार आणि त्यानंतर चकमकीत मारले गेले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत हाते. राज्य सरकारचे मंत्री पी. पाइवांग कोन्याक आणि जिल्ह्याच्या उपायुक्तांनी १८ लाख ३० हजारु रुपये दिले.
आधी त्यांना ही रक्कम सद्भावना निधी असल्याचे वाटले. नंतर कळले की ही रक्कम मृत आणि जखमी कुटुंबांसाठी राज्यसरकारकडून दिली गेलेली भरपाईची रक्कम होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने म्हटले की, ‘ओटिंग ग्रामपंचात आणि पीडित कुटुंबीय सशस्त्र दलाच्या २१ व्या पॅरा कमांडोमधील दोषींना नागरिक संहितेअंतर्गत शिक्षा मिळेपर्यंत आणि ईशान्येकडील राज्यांतून अफस्पा हटत नाही, तोपर्यंत सरकारची कोणतीची मदत स्वीकारणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.