आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानाच्या लँडिंग गेअरमध्ये लपून 8000 किमी प्रवास:16 वर्षांचा मुलगा केनियाहून नेदरलँड्समध्ये आला; नसा झाल्या जाम, सध्या रूग्णालयात आहे

एम्सटर्डम19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशा परिस्थितीत, जिवंत राहणे जवळजवळ अशक्य आहे

केनियाच्या नैरोबी विमानतळावरुन एक मालवाहू विमान तुर्की आणि ब्रिटनमार्गे नेदरलँड्सला पोहचले, म्हणजे एकूण 8 हजार किलोमीटरचा प्रवास केला. 16 वर्षाचा मुलगा विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपला होता. आता तो नेदरलँड्सच्या मास्त्रिख्त शहरातील रुग्णालयात असून त्याची प्रकृती बरी आहे.

विश्वास ठेवणे कठीण
stuff.co.nz ने एका रिपोर्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, बुधवारी केनियाच्या नैरोबी येथून Airbus A330 कार्गो फ्लाइटने टेकऑफ केले. यावेळी 16 वर्षांचा एक केनियाई मुलगा याच्या लँडिंग गेअरमध्ये लपला. तुर्की आणि ब्रिटेनमध्ये तर प्लेनचे हॉल्टही झाले.

ब्रिटननंतर हे विमान शुक्रवारी दुपारी नेदरलँड्सच्या मास्त्रिख्त विमानतळावर आले. जेव्हा अभियंत्यांनी येथे विमान तपासले तेव्हा हा मुलगा लँडिंग गिअरमध्ये दिसून आला. त्याला बाहेर काढून तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

तो जिवंत असल्याचे पाहून सर्व आश्चर्यचकित
रिपोर्टमध्ये मुलाचे नाव सांगण्यात आलेले नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, इतक्या लांब प्रवासामुळे त्याला हाइपोथर्मिया झाला आहे. ही एक मेडिकल टर्म आहे. जेव्हा एखाद्या कारणास्तव शरीराचे तापमान धोकादायक पातळीवर कमी होते तेव्हा असे होते. यामुळे नसा जाम होतात आणि मृत्यू होऊ शकतो. हा मुलगा जिवंत राहिला हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत आहे.

मुकद्दर का सिकंदर
नेदरलँड्सचे एविएशन एक्सपर्ट्स हा मुलगा विमानापर्यंत कसा पोहोचला? याचा शोध घेत आहेत. एवढ्या लांब प्रवासात कोणत्याही टप्प्यावर त्याच्या लपण्याच्या माहिती का कळाली नाही? फ्लाइट बहुतेक वेळा 38 हजार फूट उंचीवर होते. या उंचीवर, ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत, जिवंत राहणे जवळजवळ अशक्य आहे. आणखी एक गोष्ट - जेव्हा विमान उतरते तेव्हा चाके उघडतात. जरी कोणी लपले असेल तरी, तो जमिनीवर पडतो आणि मरु शकतो. या मुलासोबत हे देखील झाले नाही. एक अधिकारी म्हणाले की - 'मी या मुलाला 'मुकद्दार का सिकंदर'च म्हणू शकतो.

या मुलाने शुक्रवारी म्हटले - मी पूर्णपणे बरा आहे. केनियामध्ये आपल्या कुटुंबासोबत बोलण्याची इच्छा आहे.

दोन वेळा पूर्वीही असेच झाले, प्रत्येक वेळी मृतदेहच सापडला
2019 मध्ये केनिया एयरवेजच्या एका फ्लाइटमध्ये अशीच घटना घडली होती. ही फ्लाइट लंडनच्या हीथ्रो एअरपोर्टवर पोहोचली होती. लँडिंगपूर्वी सनबाथ घेत असलेल्या एका व्यक्तीने फोन करुन एअरपोर्ट अथॉरिटीला सांगितले होते की, लँडिंग गेअरमध्ये कुणी तरी लडकले आहे.

1997 मध्येही असेच झाले होते. यावेळीही फ्लाइट नैरोबी येथूनच आलीहोती. ही ब्रिटनच्या गॅटविक एअरपोर्टवर लँड झाली. याच्या पुढच्या लँडिंग पार्ट (nose-wheel bay) वर एक केनियामधील व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.