आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची नवी चाल:देशद्रोह्यांची नावे सांगा, 11 लाखांचे बक्षीस जिंका; परदेशी धोक्याच्या निपटाऱ्याची तयारी

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने देशाची राष्ट्रीय सुरक्षा अधिक चोख करण्यासाठी देशद्रोह्यांची नावे सांगणाऱ्या तब्बल 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

चीनच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टींचा शोध किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती देणाऱ्याला 11.6 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाऊ शकते. देशाचे विरोधक आणि देशद्रोह्यांची माहिती देणाऱ्यालाही बक्षीस देण्यात येईल.

चीनच्या जिनपिंग सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
चीनच्या जिनपिंग सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

परकीय गुप्तचर संस्थांकडून येणाऱ्या धमक्यांना तोंड देण्यासाठी ही बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, माहिती देणाऱ्याला १० हजार ते १ लाख युआनपर्यंतचे कोणतेही बक्षीस दिले जाईल.

जनतेला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न

सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनने आपल्या नागरिकांना राष्ट्रीय सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत सतर्क राहण्यास प्रोत्साहित केले आहे. यामध्ये मुलांना संभाव्य धोक्यांकडे लक्ष देण्यास शिकवणे देखील समाविष्ट आहे. वास्तविक, चीनचा राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली जनतेला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...