आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या स्पीकरची बदनामी:नॅन्सी पेलोसी यांचा चीन पत्रकाराशी लग्न झाल्याचा फोटो व्हायरल; मात्र, जर्मन ब्रॉडकास्टर DW ने नाकारले

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन संसदेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी सध्या बहुचर्चीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी तैवानमध्ये जाऊन त्यांनी चीनला आव्हान दिलेले होते. कारण चीन तैवानला त्यांचा भाग मानतो आणि तैवानशी जगातल्या कोणत्याही देशाने संबंध ठेवू पाहीले. तर अशा देशाला चीन आपला शत्रू समजू लागतो. त्यामुळेच पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे त्या चर्चेत आल्या. एकाप्रकारे नॅन्सी यांनी चीनला आव्हानच दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नॅन्सी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये नॅन्सी या एका चीनी व्यक्तीसोबत दिसत आहेत. तर नॅन्सी यांनी तरुणपणी एका चिनी पत्रकाराशी लग्न केलेले आहे, अशा वावड्या या फोटोबाबत उठविल्या जात आहेत. पण जर्मन ब्रॉडकास्टर DW यांनी आपल्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा ठरवला आहे. नॅन्सी यांनी कुठल्याही चिनी नागरिकाशी लग्न केलेले नाही. नॅन्सी यांची बदनामी करण्यासाठी चीन सरकारच्या प्रायोजित सोशल मीडिया अकाउंटवरून हा फोटो व्हायरल केला जात आहे. नॅन्सी यांनी यापुर्वी देखील चीनच्या डोळ्यात अंजन घातलेले आहे. राजकारणाच्या सुरूवातीच्या काळापासून चीनविरोधी नॅन्सी यांची भूमीका कायम ठेवली आहे.

नॅन्सी यांच्या फोटोशी छेडछाड करून एका चिनी पत्रकाराशी लग्न केल्याचा खोटा दावा केला जात आहे.
नॅन्सी यांच्या फोटोशी छेडछाड करून एका चिनी पत्रकाराशी लग्न केल्याचा खोटा दावा केला जात आहे.

नॅन्सी या अमेरिकच्या तिसऱ्या शक्तिशाली नेत्या

नॅन्सी पेलोसी या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्रपतीनंतरच्या तिसऱ्या सर्वात शक्तीशाली नेत्या आहेत. नॅन्सी यांचे कुटुंबिय राजकीय कुटुंब आहेत. त्यांचे वडील आणि भाऊ अमेरिकन शहराचे महापौर राहीले आहेत. 1987 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या नॅन्सी 2007 मध्ये सभापती (स्पीकर) बनल्या. 81 वर्षीय नॅन्सी यांची ही चौथी टर्म आहे. फोटो - राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यानंतर नॅन्सी पेलोसी या तिसर्‍या सर्वात महत्त्वाच्या अमेरिकन नेत्या आहेत.

भारतात दलाई लामांची भेट घेऊनल चीनशी पंगा

निर्वासित तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना चीन आपला शत्रु मानतो. दलाई लामा यांची कोणत्याही देशाच्या नेत्याने भेट घेतल्याने चीन संतापतो. असे असूनही नॅन्सी पेलोसी यांनी दलाई लामांना त्यांच्या दोन भारत भेटींदरम्यान भेट दिली. 2008 आणि 2017 मध्ये नॅन्सी भारतात दलाई लामांना भेटल्या होत्या. दोन्ही वेळा चीन सरकारच्या वतीने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

चीनमध्ये लोकशाही समर्थक पोस्टर झळकावले

1991 साली खासदार म्हणून नॅन्सी एका शिष्टमंडळासह चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी राजधानी बीजिंगमधील प्रसिद्ध तियानमेन चौक गाठून चीनला विरोध केला. नॅन्सी आणि त्यांच्या सहकारी अमेरिकन खासदारांनी लोकशाही समर्थनाचे पोस्टर्स झळकावले होते. 1989 मध्ये चीनने तियानमेन चौकात हजारो लोकशाही समर्थकांना गोळ्या घालून ठार केले होते.

25 वर्षात अमेरिकन नेत्याची तैवानची पहिली भेट

नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट देखील महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण 25 वर्षात तैवानला भेट देणार्‍या त्या पहिल्या प्रमुख अमेरिकन नेत्या आहेत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, प्रदीर्घ राजकीय मुत्सद्दी अनुभव आणि एक मजबूत जागतिक नेत्याची प्रतीमा पाहता नॅन्सी यांची अमेरिकन प्रशासनाच्या महत्त्वाच्या भेटीसाठी निवड करण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...