आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Narayan Murthy's Daughter Is Richer Than The Queen Of England; Finance Minister Has Come On The Radar For Hiding Assets

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नारायण मूर्ती यांची मुलगी इंग्लंडच्या महाराणीपेक्षा श्रीमंत; मालमत्ता लपवल्याने रडारवर आले आहेत अर्थमंत्री जावई

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षताकडे इन्फोसिसचे 4300 कोटी रुपयांचे शेअर, पतीची मालमत्ता 2 हजार कोटी

भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक इंग्लंडचे अर्थमंत्री आहेत. आपली मालमत्ता सांगताना पारदर्शकता न ठेवल्याने ते रडारवर आले आहेत. मूर्ती यांची मुलगी अक्षताचे इन्फोसिसमध्ये ०.९१% भागभांडवल आहे. त्याचे मूल्य ४३०० कोटी रुपये (४३० मिलियन पौंड) आहे. कौटुंबिक कंपन्यांमधील भागभांडवलामुळे अक्षता इंग्लंडच्या श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. संडे टाइम्सच्या यादीनुसार त्या इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत आहेत. महाराणीकडे ३५०० कोटी रुपयांची (३५० मिलियन पौंड) मालमत्ता आहे. द गार्डियन वृत्तपत्राने दावा केला आहे की, अक्षता इतर अनेक कंपन्यांमध्येही संचालक आहेत. मात्र, ऋषी यांनी सरकारी रजिस्टरमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. ऋषी सुनक यांच्याकडे २००० कोटी रुपयांची (२०० मिलियन पौंड) मालमत्ता असल्याचे बोलले जाते. ते इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत खासदारही आहेत. कर्तव्य पार पाडताना हिताला बाधा आणणाऱ्या सर्व आर्थिक बाबी जाहीर करणे इंग्लंडमध्ये प्रत्येक मंत्र्याला आवश्यक आहे. सुनक यांनी गेल्या महिन्यात रजिस्टरला दिलेल्या माहितीत अक्षता वगळता कोणताच उल्लेख केला नाही. अक्षता लहान कंपनी कॅटामारान व्हेंचर्सची मालक असल्याचेच फक्त त्यांनी सांगितले. मात्र, ताज्या वृत्तात खुलासा झाला की, अक्षता व त्यांच्या कुटुंबाचे अनेक आर्थिक हित इंग्लंडमध्ये गुंतले आहेत. द गार्डियनने एक यादीही प्रसिद्ध केली. यात दिसते की, अक्षता मूर्तींची मालमत्ता अब्ज-खर्व रुपयात आहे. अक्षता व ऋषी यांची भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली होती. दोघांनी २००९मध्ये लग्न केले होते. कोरोनाकाळात इंग्लंडमध्ये पॅकेज दिल्याने ऋषी चर्चेत आले होते.

मूर्ती कुटुंबाचा बिझनेस पोर्टफोलिओ

> इन्फोसिसमध्ये भागीदारी : १७ हजार कोटी रुपये. इंग्लंडमध्ये १० हजार कर्मचारी, सरकारी ठेका

> अॅमेझॉनसोबत भारतात संयुक्त प्रकल्प क्लाउडटेल : ९ हजार कोटी रुपये वार्षिक

> इंग्लंडमध्ये जेमी ऑलिव्हर उपाहारगृह चेन चालवणारी फर्म आणि भारतमध्ये बर्गर चेन वेंडिजमध्ये भागीदारी

> कोरू किड्समध्येही भागीदारी आणि डिग्मे फिटनेसमध्ये संचालक

> नारायण मूर्ती यांची मुलगी पाच कंपन्यांत भागीदार किंवा संचालक आहे.

> अक्षता सॉफ्टवेअर कंपनी सोरोकाच्या यूके युनिटच्या संचालक आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser