आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Narendra Modi Popularity | India PM Modi Approval Ratings Stand At 66 Per Cent Ahead Joe Biden Merkel; News And Live Updates

लोकप्रियतेत मोदी जगात अव्वल:नरेंद्र मोदींनी अमेरिकेसह 13 देशांतील नेत्यांना टाकले मागे; पंतप्रधानांना 66% लोक देतात पसंती

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातील 2 हजार 126 लोकांचा सर्वेक्षणात समावेश

कोरोना महामारीची दुसरी लाट आण‍ि त्याच्या दुष्पपरिणामानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अबाधित आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीवरुन मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होईल असे वाटत होते. परंतु, अमेरिकन डेटा इंटेलिजेन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात मोदी जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहेत. त्याच्या लोकप्रियतेला 100 पैकी 66% क्रमांक मिळाले आहे.

या सर्वेक्षणात अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आण‍ि जर्मनीसह 13 देशातील नेत्यांचा समावेश होता. तथापि, गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेत 20 टक्क्यांनी घट झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. तरीदेखील मोदी यांना जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 66 टक्के लोक पसंत करत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

भारतातील 2 हजार 126 लोकांचा सर्वेक्षणात समावेश
या सर्वेक्षणात भारतातील 2 हजार 126 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 28 टक्के लोकांनी मोदी यांना नापसंत केले आहे. या यादीमध्ये तीन देशातील नेत्यांना 60 टक्क्यांवर रेटिंग आहे. ज्यामध्ये मोदीनंतर इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी आण‍ि मॅक्सिकोचे राष्ट्रपती लोपेझ ओब्रेडोर यांचा समावेश आहे. मारिओ ड्रॅगी यांना 65 टक्के तर ओब्रेडोर यांना 63 टक्के रेटिंग आहे.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स अमेरिका, भारत, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि यूके मधील नेत्यांच्या मान्यता रेटिंगचा मागोवा घेतो आणि दर आठवड्याला नवीन डेटासह त्याचे पान अपडेट करते करते.

कोणत्या नेत्यांची किती रॅकिंग?
1. नरेंद्र मोदी: 66%
2. मारिओ ड्रॅगी (इटली) : 65%
3. लोपेज ओब्राडोर (मेक्सिको) : 63%
4. स्कॉट मॉरिसन (ऑस्ट्रेलिया) : 54%
5. एंजेला मर्केल (जर्मनी) : 53%
6. जो बिडेन (अमेरिका): 53%
7. जस्टिन ट्रूडो (कॅनडा): 48%
8. बोरिस जॉनसन (युके): 44%
9. मून जे-इन (दक्षिण कोरिया): 37%
10. पेड्रो सांचेझ (स्पेन): 36%
11. जायर बोल्सोनारो (ब्राझील): 35%
12. इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्‍स): 35%
13. योश‍िहिदे सुगा (जपान): 29%

राष्ट्राच्या नावे संबोधनामुळे सुधारली मोदींची रँकिंग
पंतप्रधान मोदी यांनी 7 जून रोजी दिलेल्या राष्ट्राच्या नावे संबोधनामुळे त्यांची रँकिग सुधारल्याचे एजन्सीने म्हटले आहे. एजन्सीने पुढे म्हटले की, मोदी यांनी देशाला संबोधित करताना 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस मोफत देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, त्यांनी 75 टक्के लस राज्य सरकारांना पुरवणार असल्याचे सांगितले होते. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी गरीबांना रेशन मोफत देण्याचे आश्वासन देखील मोदी यांनी दिले होते.

मॉर्निंग कन्सल्ट कंपनी सर्वेक्षण कसे करते
1. कंपनीने दावा केला आहे की, त्यांची ओळख 10 कोटी लोकांपर्यंत आहे त्यामुळे त्यांना संशोधन करणे सोपे होते.

2. कंपनीने 100 पेक्षा जास्त देशात आतापर्यंत 1.5 कोटी लोकांची मुलाखत घेतली आहे.

3. कंपनी संशोधनासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदम (एमएल) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) साधनांचा वापर करते.

बातम्या आणखी आहेत...