आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Narendra Modi USA Trip Live Updates Indian American Community Indian Diaspora Meeting To Kamala Harris; News And Live Updates

मोदींचा अमेरिका दौरा:पंतप्रधान आज पहाटे 3.30 वाजता वॉशिंग्टनमध्ये दाखल, भारतीयांनी केले जोरदार स्वागत; मोदी आज कमला हॅरिस यांची घेणार भेट

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी आज कमला हॅरिस यांची भेट घेतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार, पंतप्रधान मोदी आज सकाळी 3.30 वाजता वॉशिंग्टना पोहोचले आहेत. दरम्यान, अमेरिकन अधिकारी आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले आहे. संधू यांनी 'नमस्ते यूएसए' म्हणत मोदी यांचे अभिवादन केले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भारतीय समुदायाचे लोकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे भर पावसातही भारतीयांचे उत्साह कमी झाले नाही.

मोदी आज कमला हॅरिस यांची भेट घेतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमधील हॉटेल बिलार्ड येथे मुक्कामाला आहेत. मोदींनी यावेळी लोकांच्या शुभेच्छांना चांगला प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदी आज अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये भारत आणि अमेरिकेच्या समान हितसंबंधांवर चर्चा केली जाणार आहे.

विशेष म्हणजे कमला हॅरिस या भारतीय वशांच्या आहेत. मोदी आज हॅरिस यांच्या व्यतिरिक्त, अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक आणि क्वालकॉम, अ‍ॅडोब आणि ब्लॅकस्टोन सारख्या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतील. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.

पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये भारतीय वंशाच्या महिलांची भेट घेत आहेत.
पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये भारतीय वंशाच्या महिलांची भेट घेत आहेत.

असा असेल पंतप्रधानांचा दौरा
23 सप्टेंबर : अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांच्यासोबत क्वालकॉम, अ‍ॅडोब यांसारख्या कंपन्यांच्या प्रमुखांशी भेट. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत बैठकीची शक्यता. ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा.
24 सप्टेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. क्वाड नेत्यांसोबत व्हाइट हाऊसमध्ये बैठक.
25 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्रात भाषण. 26 सप्टेंबरला भारतात परत.

पंतप्रधानांनी स्वत: त्यांचा हा फोटो शेअर केला आहे. ते म्हणाले की, लांबच्या फ्लाइटचा फायदा म्हणजे तुम्हाला काही काम करण्याची संधी मिळते.
पंतप्रधानांनी स्वत: त्यांचा हा फोटो शेअर केला आहे. ते म्हणाले की, लांबच्या फ्लाइटचा फायदा म्हणजे तुम्हाला काही काम करण्याची संधी मिळते.
बातम्या आणखी आहेत...