आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Narendra Modi Vs Imran Khan; Imran Khan, Narendra Modi, PM Modi, PoK, Jammu And Kashmir, Article 370, India Pakistan Tensionl; News And Live Updates

PoK मध्ये इम्रानचा प्रचार:पाकिस्तानी पंतप्रधान जगभरात स्वत:ला काश्मिरी लोकांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर संबोधतात; 2 दिवसांत दुसर्‍यांदा केली आरएसएसवर टीका

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मिरमधील जुनी परिस्थिती पूर्ववत झाली तर चर्चेसाठी सहमत

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे संघ फोबिया संपण्याचे नाव घेत नाहीये. त्यांनी 2 दिवसांत दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. पाकव्यात काश्मीरमध्ये (PoK) निवडणूक रॅलीला ते संबोधित करत होते. त्यांनी प्रत्येक आतंरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वत:ला काश्मीरी लोकांचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून संबोधले आहे.

उझबेकिस्तानमध्ये 16 जुलै रोजी इम्रान खान यांनी मध्य दक्षिण एशिया परिषदेत सहाभाग घेतला होता. दरम्यान, दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकते का? याबाबत काही पत्रकारांनी विचारणा केली होती. यावर ते म्हणाले की, 'भारताचे आम्ही किती काळापासून वाट पाहत आहोत की, आम्ही एक सुसंस्कृत शेजारी म्हणून राहू. पण काय करावे, आरएसएसची विचारसरणी आडवी येते.'

संघाची विचारसरणी भारतासाठी धोकादायक - इम्रान खान
'भाजप आणि संघाची विचारसरणी भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे. कारण ही विचारसरणी केवळ मुस्लिमांनाच लक्ष्य करत नाहीतर शिख, ख्रिश्चन, एससीलादेखील लक्ष्य करते. या लोकांनाही समान दर्जा देत नाही अशी टीका इम्रान खान यांनी संघ आणि भाजपवर केली होती. ते 17 जूलै रोजी पाकव्यात काश्मीरमधील बाघ भागात निवडणुकीसंदर्भांतील बैठकीसाठी आले होते.

या वर्षीच म्हटले होते - काश्मिरमधील जुनी परिस्थिती पूर्ववत झाली तर चर्चेसाठी सहमत
इम्रान खान यांनी यावर्षी जूनमध्ये म्हटले होते की, जर काश्मीरमधील जुनी परिस्थिती बहाल करण्यासाठी भारताने रोडमॅप बनवला तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहोत. त्यांनी म्हटले होते की, भारताने पाकिस्तानला सांगावे की, काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय परत घेण्यासाठी पाऊले उचलावीत. काश्मीरचे स्पेशल स्टेटस संपवणे इंटरनॅशनल लॉ आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन आहे.

बातम्या आणखी आहेत...