आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिंग्टन:चंद्राच्या पृष्ठभागावर नासाला लागला पाण्याचा शाेध

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्याची किरणे पडणाऱ्या भागात पाणी असल्याचा शाेध नासाला लागला आहे. या शाेधामुळे भविष्यात चंद्रावर काढण्यात येणाऱ्या मानवी माेहिमेला माेठे बळ मिळणार आहे. नासाच्या ‘स्ट्रेटाेस्फिअर आॅब्झर्व्हेटरी फाॅर इन्फ्रारेड अॅस्ट्राॅनाॅमी’ने (साेफिया) हा शाेध लावला आहे.

चंद्राच्या दक्षिण गाेलार्धामध्ये पृथ्वीवरून दिसणाऱ्या सर्वात माेठ्या खड्ड्यात असलेल्या एका क्लेव्हियस क्रेटरमध्ये पाण्याचे अणू असल्याचे साेफियाला आढळून आले आहे. याआधीच्या अभ्यासात चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्राेजनचे काही घटक आढळून आले हाेते. परंतु पाणी आणि नजीकचा नातेवाईक समजल्या जाणाऱ्या हायड्राॅक्सिलचा शाेध लागू शकला नव्हता. ‘नेचर अॅस्ट्राॅनाॅमी’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार १०० ते ४१२ भाग प्रति दशलक्षच्या आर्द्रतेमध्ये पाणी असल्याचे दिसून आले आहे. तुलनात्मकदृष्ट्या साेफियाने चंद्राच्या पृष्ठभागावर शाेधलेल्या पाण्याचे प्रमाण हे आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या तुलनेत १०० पट कमी आहे. पाण्याचे प्रमाण कमी असले तरी या शाेधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार हाेते, असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्राच्या कठाेर आणि वायुविरहित वातावरणातही हे पाणी कसे तयार हाेते हा त्याहीपेक्षा माेठा प्रश्न पडला आहे.