आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पर्सिव्हरन्स रोव्हरच्या मंगळ ग्रहावरील लँडिंगचे ऑडियो रेकॉर्डिंग प्रसारित केली आहे. या 10 सेकंदांच्या ऑडियो क्लिपमध्ये अगदी किरकोळ आवाज रेकॉर्ड झाला आहे. नासाने दावा केला आहे की, ज्यावेळी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील जेजेरो क्रेटरवर उतरला त्यावेळी तेथे असलेल्या माती आणि धुळांवर दबाव पडल्याने हे घडले. त्याचबरोबर नासाने गुरुवारी लँडिंग केलेल्या रोव्हरचा एक व्हिडियो जारी केला आहे.
लँडिंगनंतर मायक्रोफोनचे कार्य बंद झाले होते
मीडिया रिपोर्टमध्ये नासाच्या हवाल्यानुसार सांगण्यात आले आहे की, गुरुवारी पर्सिव्हरन्स रोव्हरच्या लँडिंग दरम्यान अचानकपणे मायक्रोफोनने कार्य करण्याचे बंद केले होते. याकारणामुळे रोव्हरच्या लँडिंगचा ऑडियो समोर आला नाही. परंतु, नंतर मायक्रोफोनचे काम पूर्ववत झाल्यानंतर नासाने याची क्लिप प्रसारित केली.
मिशन मंगळचा कॅमेरा आणि मायक्रोफोन विभागातील अभियंता डेव ग्रुएल म्हणाला की, या 10 सेकंदांच्या या क्लिपमधील आवाज अतिशय मंद आणि किंचित ऐकू येत असून ते संशोधनांसाठी अत्यंत मोलाचे आहे.
Your front-row seat to my Mars landing is here. Watch how we did it.#CountdownToMars pic.twitter.com/Avv13dSVmQ
— NASA's Perseverance Mars Rover (@NASAPersevere) February 22, 2021
नासाने व्हिडियो क्लिप केली व्हायरल
नासाने पर्सिव्हरन्स रोव्हरच्या लँडिंग दरम्यानची ऑडियोसोबतच एक व्हिडियो क्लिप (टच डॉऊन) प्रसारित केला आहे. या 3 मिनट 25 सेकंदांच्या व्हिडियोमध्ये तीन फ्रेम असून रोव्हरने लँडिंग कशी केली दिसते. यामध्ये हीट शील्ड आणि पॅराशूटही नजरेस पडतात. नासाने म्हटले की, हे ऐतिहासात पहिल्यांदा घडले असून यात लँडिंगचा व्हिडियो आणि फोटो घेण्यात आला. आम्ही याचा संशोधनासाठी सुरूवात केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.