आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या स्पेस-X क्रू-6 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण:फाल्कन 9 रॉकेटद्वारे 4 अंतराळपटू अंतराळात, 6 महिने ISS वर राहणार

वॉशिंग्टन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

NASA च्या स्पेस-X क्रू-6 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. स्पेस -X फाल्कन-9 रॉकेटने (ड्रॅगन एंडेव्हर) अमेरिकेच्या फ्लोरिडा स्थित केनेडी स्पेस सेंटरच्या गुरुवारी मध्यरात्री 1.45 वा. (भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी 12.15 वा.) अंतराळात यशस्वी झेप घेतली.

स्पेस-X चे फाल्कन-9 रॉकेट 4 अंतराळपटूंना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचवेल. ही एलन मस्क यांच्या स्पेस-X ची 6 वी ऑपरेशनल क्रू फ्लाइट आहे. त्यात 2, रशियाच्या व UAE च्या एका अंतराळपटूचा समावेश आहे.

हे फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवर उभ्या स्पेस एक्स फाल्कन रॉकेटचे छायाचित्र आहे. यातून चारही अंतराळपटू अंतराळ केंद्रावर जातील.
हे फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवर उभ्या स्पेस एक्स फाल्कन रॉकेटचे छायाचित्र आहे. यातून चारही अंतराळपटू अंतराळ केंद्रावर जातील.
स्पेसएक्सच्या रॉकेटमध्ये बसलेले 4 क्रू मेंबर्स.
स्पेसएक्सच्या रॉकेटमध्ये बसलेले 4 क्रू मेंबर्स.

6 महिने संशोधन कार्य करणार अंतराळपटू

हे अंतराळपटू 6 महिन्यांपर्यंत ISS वर राहतील. तिथे ते हार्ट मसल टिश्यू, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मानवी पेशी व टिश्यू प्रिंट करणाऱ्या बायोप्रिंटरचे परिक्षण करतील. तसेच औषध उत्पादनाच्या तंत्रज्ञानावरही रिसर्च करतील.

हे आहेत स्पेस-X क्रू-6 मोहिमेतील अंतराळपटू

क्रू-6 मोहिमेतील 4 अंतराळपटूंमध्ये नासाच्या स्टीफन बोवेन व वॉरेन वुडी होबर्ग यांचा समावेश आहे. याशिवाय UAE च्या सुलतान अल्नेयादी व रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कोस्मोस च्या अँड्री फेडेएव्ह यांचाही या मोहिमेत समावेश आहे.

अल्नेयादी अंतराळ स्थानकावर प्रदिर्घ काळासाठी जाणारे UAE चे पहिले अंतराळपटू आहेत. त्यांची निवड मोहम्मद बिन राशीद स्पेस सेंटरच्या (MBRSC) नासा व एग्जिऑम स्पेसमध्ये झालेल्या एका करारांतर्गत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...