आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • NASA Spacex Inspiration4 Civilian Spaceflight Launch LIVE Video Update; Elon Musk | Space Tourism Elon Musk, Inspiration4 Crew

आजपासून स्पेस टुरिझम सुरू:​​​​​​​एलन मस्क यांच्या कंपनीने रचला इतिहास, 4 सामान्य लोकांना रॉकेटने अंतराळात पाठवले; ते 575 किमी वर पृथ्वीच्या कक्षेत 3 दिवस घालवतील

फ्लोरिडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे कॅप्सूल 357 मैल म्हणजेच सुमारे 575 किलोमीटरच्या उंचीवर तीन दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल.

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स ने आज इतिहास रचला. त्यांनी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:33 वाजता 4 सामान्य लोकांना अवकाशात पाठवले. नासाच्या फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस रिसर्च सेंटरवरुन फॉल्कन-9 रॉकेटची लॉन्चिंग झाली. याच्या सुमारे 12 मिनिटांनंतर, ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटपासून वेगळे झाले.

हे कॅप्सूल 357 मैल म्हणजेच सुमारे 575 किलोमीटरच्या उंचीवर तीन दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. 2009 नंतर प्रथमच मानवाने इतकी उंची गाठली आहे. मे 2009 मध्ये, शास्त्रज्ञांनी 541 किमी उंचीवर जाऊन हबल टेलिस्कोपची दुरुस्ती केली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)वर अंतराळवीरांचे येणे-जाणे चालू असते, परंतु ते 408 किलोमीटरच्या उंचीवर आहे. या मिशनला इंस्पिरेशन 4 असे नाव देण्यात आले आहे.

या मिशनचा हेतू चॅरिटी
या मिशनचा उद्देश अमेरिकेतील टॅनेसी येथील सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे आहे. मिशनचे नेतृत्व करणाऱ्या इसॅकमनला त्यातून 20 कोटी डॉलर जमा करायचे आहेत. ते स्वतः या रकमेचा निम्मा भाग देतील. या मिशनद्वारे कर्करोगाविषयी जागरूकता देखील वाढवली जाईल. मिशनच्या सदस्यांना विविध मानवी मूल्ये देण्यात आली आहेत. जसे लीडरशीप, होप, इंस्पिरेशन आणि प्रॉस्पॅरिटी. मिशनची एक सदस्य, ती सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमध्ये फिजिशियन असिस्टंट आहे आणइ कँसर सर्वाइवर देखील आहे. तिचे कँसरवरील उपचार याच हॉस्पिटलमध्ये झाले आहेत.

कोण आहेत क्रू मेंबर?

  • जेयर्ड इसाकमन: मिशनची संपूर्ण कमांड इसाकमनच्या हातात आहे. 38 वर्षीय इसाकमन शिफ्ट 4 पेमेंट्स नावाच्या पेमेंट कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी ही कंपनी सुरू केली आणि आज ते अब्जाधीश आहेत. ते एक प्रोफेशनल पायलट आहेत आणि अमेरिकन हवाई दलाच्या वैमानिकांना त्याच्या पायलट प्रशिक्षण कंपनीद्वारे प्रशिक्षण देतात.
  • हेयली आर्केनो : हेयली एक कँसर सर्वाइवर आहे. 29 वर्षीय हेयली अंतराळात जाणारी सर्वात तरुण अमेरिकन नागरिक आहेत. तिला हाडांचा कर्करोग होता आणि तिच्यावर टेनेसीच्या सेंट जूड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. मिशनमध्ये, हेयली यांना वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी मिळाली आहे.
  • शॉन प्रोक्टर: 51 वर्षीय प्रोक्टर एरिजोना येथील महाविद्यालयात जियोलॉजीच्या प्राध्यापक आहेत. प्रोक्टर यांच्या वडिलांनी अपोलो मोहिमेदरम्यान नासासोबत काम केले आहे. त्यांनी स्वतः नासाच्या अंतराळ कार्यक्रमात अनेक वेळा भाग घेतला आहे.
  • क्रिस सेम्ब्रोस्की: 42 वर्षीय क्रिस अमेरिकन हवाई दलाचे वैमानिक होते आणि इराक युद्धातही ते सहभागी होते. क्रिस सध्या एयरोस्पेस आणि डिफेंस निर्माता कंपनी लॉकहीड मार्टिनसोबत काम करत आहेत.

मिशनमध्ये काय विशेष आहे?
पृथ्वीच्या कक्षेत जाणारा हा पहिला नॉन प्रोफेशनल एस्ट्रोनॉट्सचा क्रू आहे. या मोहिमेतील चारही सदस्य यापूर्वी कधीही अंतराळात गेलेले नाही. चौघेही सामान्य लोक आहेत.

यापूर्वी ब्लू ओरिजिन आणि वर्जिन स्पेस शिपने देखील प्रायव्हेट स्पेस टूरिज्मची सुरुवात करत उड्डाण घेतली होती, मात्र हे दोघं स्पेसक्राफ्ट एज ऑफ स्पेसपर्यंतच गेले होते. दुसरीकडे इसाकमनचा स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये चक्कर मारेल. अंतराच्या हिशोबाने पाहिले तर हे पहिल्या दोन्ही स्पेसक्राफ्टपासून जवळपास 475 किलोमीटर जास्त दूर जाईल.

ब्लू ओरिजिन आणि वर्जिन स्पेस शिपचे मिशन काही मिनिटांचेच असायचे. हे लोक अंतराळात गेले आणि काही मिनिटांनंतर पुन्हा पृथ्वीवर परतले, मात्र हे मिशन तीन दिवसांचे आहे.

या स्पेसक्राफ्टमध्ये दोन ट्रेन्ड पायलट आहेत, मात्र स्पेसक्राफ्टला ऑपरेट करण्यात त्यांचा कोणताही वाटा नाही. वर्जिन स्पेस शिपला दोन पायलट ऑपरेट करत होते.

हा प्रवास ड्रॅगन स्पेसक्राफ्टने ठरवण्यात आला
चारही लोक ड्रॅगन स्पेसक्राफ्टने अंतराळात पोहोचले होते. हे अवकाशयान एकाच वेळी 7 लोकांना अंतराळात घेऊन जाऊ शकते. हे मानवाला अंतराळात नेणारे पहिले खासगी अंतराळ यान आहे. हे फॉल्कन -9 रॉकेटमधून लॉन्च करण्यात आले.

अद्याप खर्चाचा खुलासा नाही
या संपूर्ण ट्रिपचा खर्च जेयर्ड इसाकमन करत आहेत. मिशनची एकूण किंमत अद्याप उघड केली गेली नाही, परंतु असे मानले जाते की इसाकमनने मिशनसाठी स्पेसएक्सला भरीव रक्कम दिली आहे. कदाचित मिशन पूर्ण झाल्यानंतर, इसाकमन खर्चाचा तपशील सार्वजनिक करतील.

बातम्या आणखी आहेत...