आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवरून मंगळापर्यंतचा प्रवास 45 दिवसांत शक्य:नासाच्या नव्या तंत्रज्ञानाची किमया; सध्या रॉकेटला 7 महिने लागतात

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन तंत्रज्ञानामुळे मंगळावर मानव पाठवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.  - Divya Marathi
नवीन तंत्रज्ञानामुळे मंगळावर मानव पाठवण्याचा मार्ग सुकर होणार आहे. 

जगभरातील अनेक देश अनेक दशकांपासून मंगळावर मानव पाठवण्याची तयारी करत आहेत. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या मते, पृथ्वी ते मंगळाचा प्रवास 7 महिन्यांचा आहे. आतापर्यंत मंगळावर गेलेल्या सर्व रॉकेटला जवळपास सारखाच वेळ लागला आहे. मात्र, आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रवास अवघ्या 45 दिवसांवर येणार आहे.

'न्यूक्लियर थर्मल अँड न्यूक्लियर इलेक्ट्रिक प्रोपल्जन' असे या नवीन तंत्रज्ञानाचे नाव आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, नासा मानवी मंगळ मोहिमेसाठी असे रॉकेट बनवणार आहे, ज्यामध्ये अणुइंधन वापरले जाईल.

दोन तंत्रांच्या मदतीने रॉकेट बनवले जाणार

शास्त्रज्ञांनी रॉकेटचा पहिला भाग विकसित करण्यास सुरुवात केली आहे. हे त्याच रॉकेटचे इलस्ट्रेशन आहे.
शास्त्रज्ञांनी रॉकेटचा पहिला भाग विकसित करण्यास सुरुवात केली आहे. हे त्याच रॉकेटचे इलस्ट्रेशन आहे.

रॉकेट बनवण्यासाठी दोन तंत्रांचा वापर केला जाणार आहे. प्रथम- न्यूक्लियर थर्मल प्रोपल्जन. त्यात अणुभट्टी असते, जी लिक्विड हायड्रोजन प्रोपेलेंट गरम करते. तज्ज्ञांच्या मते असे केल्याने प्लाझ्मा तयार होईल. हा प्लाझ्मा रॉकेटच्या नोझलमधून बाहेर काढला जाईल, ज्यामुळे रॉकेटला पुढे जाण्यासाठी गती मिळेल. 1955 मध्ये, यूएस एअर फोर्स आणि अणुऊर्जा आयोगाने अशी प्रोपल्जन सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

दुसऱ्या तंत्रज्ञानाचे नाव आहे न्यूक्लियर इलेक्ट्रिक प्रोपल्शन. यामध्ये अणुभट्टी आयन इंजिनला वीज देते, ज्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे क्षेत्र झेनॉन सारख्या वायूंना गती देते, ज्यामुळे रॉकेटला पुढे जाण्याचा वेग मिळतो. 2003 आणि 2005 मध्येही ही यंत्रणा बनवण्याचे प्रयत्न झाले.

रॉकेटची कामगिरी दुप्पट होईल

नवीन तंत्रज्ञानाद्वारे शास्त्रज्ञ रॉकेटची कार्यक्षमता जवळपास दुप्पट करू शकतील. रॉकेट बनवण्याची ही संकल्पना फ्लोरिडा विद्यापीठातील हायपरसोनिक्स प्रोग्राम एरिया लीड प्रोफेसर रेयान गोसे यांनी दिली आहे. त्याचा पहिला टप्पा विकसित करण्यासाठी, आणखी 13 लोकांना त्याच्यासोबत सह-संशोधनात सहभागी करून घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 12.5 हजार डॉलर्स म्हणजेच 10 लाख 18 हजार रुपये ही प्रारंभिक रक्कमही देण्यात आली आहे.

मानवाला मंगळावर जाणे सोपे होणार

जुन्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगळ मोहीम केवळ 3 वर्षांसाठीच चालवता येणार आहे.
जुन्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगळ मोहीम केवळ 3 वर्षांसाठीच चालवता येणार आहे.

सध्या आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये यानाला पृथ्वीवरून मंगळावर जाण्यासाठी 7 ते 9 महिने लागतात. या वेगाने आपण मानवाला मंगळावर पाठवले तर दर 26 महिन्यांनी एक विमान मंगळावर जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच, एखादे मिशन फक्त 3 वर्षांसाठी चालवता येईल.

मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे मंगळावर जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. पृथ्वी ते मंगळाचा प्रवास केवळ 6.5 आठवड्यांचा असेल, ज्यामुळे मिशनचा खर्च कमी होईल आणि वेळ वाढेल. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात, लोकांना आरोग्य समस्या कमी होण्याची शक्यता असते. नासाचे हे रॉकेट कधी तयार होईल, याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...