आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलियन किंवा उडत्या तबकड्यांचे गूढ उकलावे यासाठी नासाने एक अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे. खुल्या मेंदूच्या साह्याने अस्पष्ट अशा दृश्यांचा मागाेवा घेणार आहे. त्यासाठी संशाेधकांची टीम तयार करण्यात आली आहे. नासाचे विज्ञान मिशनचे प्रमुख थाॅमस जुर्बुचेन नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेस वेबकास्टदरम्यान म्हणाले, आम्ही प्रतिष्ठित अशा जाेखमीच्या गाेष्टीपासून दूर पळणार नाही. या घटनांमध्ये सर्वाधिक मोठे आव्हान म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेला डेटा. ताे अत्यंत कमी स्वरूपात आहे. वास्तविक संशाेधनात डेटाला महत्त्व असते. सध्या तरी यूएपी किंवा अज्ञात घटनेच्या रूपातील ज्ञात आकाशातील गूढ दृश्यांना समजून घेण्याच्या दिशेने असलेले पहिले पाऊल असल्याचे नासा मानते. नासा या प्रकल्पावर ७७ लाख रुपयांपर्यंत खर्च करेल. या संशाेधनाला गती देण्यासाठी सिमन्स फाउंडेशनचे अध्यक्ष अॅस्ट्राेफिजिस्ट डेव्हिड स्पर्गेल या टीमचे नेतृत्व करतील. स्पर्गेल म्हणाले, यूएपीकडे अनेक स्पष्टीकरण असतील. परंतु आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे द्यावी लागतील. मी माझा बहुतांश करिअर एक ब्रह्मांडविषयक संशाेधक म्हणून घालवले आहे. ब्रह्मांडाचा ९५ टक्के भाग नेमका काय आहे हे आपल्याला ठाऊक नाही. म्हणूनच अशा गाेष्टी आपल्या समजण्यापलीकडील आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.