आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाचा पर्सिव्हरेंस मार्स रोव्हर गुरुवारी मंगळ ग्रहावर मानवी जीवन शोधण्यासाठी उतरणार आहे. हा रोव्हर रात्री उशीरा दोन ते तीन वाजेच्या दरम्यान मंगळ ग्रहावरील सर्वात धोकादायक असलेल्या जजीरो क्रेटरवर उतरेल. या जागेवर एकेकाळी पाणी होते. नासाने दावा केला आहे की, रोव्हरच्या इतिहासातील ही मंगळावरील सर्वात अचूक लँडींग असणार आहे. तसेच, पर्सिव्हरेंस रोव्हर मंगळावरुन मातीचे नमूने देखील आणणार आहे.
पाणी आणि जीवनाचा शोध करणार
पर्सिव्हरेंस मार्स रोव्हर आणि इंजीन्यूटी हॅलिकॉप्टर मंगळावर कार्बन डाय-ऑक्साईडमधून ऑक्सीजन बनवण्याचे काम करणार आहे. हे जमिनीच्या भुभार्गातील जीवनाचा आणि पाण्याच्या शोधासंबंधी माहिती घेईल. हा रोव्हर मार्स एनव्हार्यमेंट डायनामिक्स अॅनालायझर (एमइडीए) मंगळ ग्रहावरील हवामान आणि पाण्यासंदर्भांत अभ्यास करणार आहे.
मिशनवर चौथ्या पिढीचा पाचवा रोव्हर
पर्सिव्हरेंस हा नासाचा चौथ्या पिढीचा रोव्हर असून यापूर्वी नासाने मंगळावर चार रोव्हर पाठवले आहे. यापूर्वी पाथ फाइंडर अभियानासाठी सोजोनरला 1947 मध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर 2004 मध्ये स्पिरिट आणि ऑपूर्च्यूनिटीला पाठवले होते. तसेच, 2012 मध्ये क्यूरिऑसिटीने देखील मंगळ ग्रहावर तळ ठोकला होता.
असा आहे पर्सिव्हरेंस मार्स रोव्हर
नासाच्या मार्स अभियानाचे नाव 'पर्सिव्हरेंस मार्स रोव्हर आणि इंजिन्यूटी हॅलिकॉप्टर' आहे. पर्सिव्हरेंस रोव्हर 1000 किलोग्राम वजनाचा असून तो परमाणू उर्जेवर चालतो. पहिल्यांदाच एखाद्या रोव्हरमध्ये प्लूटोनियम इंधनाचा वापर केला जात आहे. हा रोव्हर मंगळ ग्रहावर 10 वर्षापर्यंत काम करू शकतो. यात 7 फुटाचा रोबोटीक आर्म, 23 कॅमेरे आणि एक ड्रील मशीन आहे. तसेच, या हॅलिकॉप्टरचे वजन 2 किलोग्राम आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.