आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महामारी पसरवणाऱ्या चीनमध्ये ‘मेळा’:नॅशनल डेनिमित्त 8 दिवस सुटी; महामारीत 60 कोटी लोकांची भटकंती

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र शांघाय रेल्वेस्थानकाचे आहे. गुरुवारी येथे पाय ठेवायलाही जागा नव्हती एवढी गर्दी होती.
  • १ ऑक्टोबर १९४९ रोजी नामकरण - पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना

संपूर्ण जगात कोरोना संसर्ग पसरवणाऱ्या चीनने गुरुवारी ७१ वा राष्ट्रीय दिन साजरा केला. आता यानिमित्ताने सरकारने देशात ८ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुटी जाहीर केली आहे. ही सुटी साजरी करण्यासाठी लोक देशभरात महामारीच्या काळात भटकंतीवर निघाले आहेत. सुमारे ६० कोटी लोक ८ दिवसांच्या पर्यटनासाठी निघाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नॅशनल डेसाठी देशभरातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळांची सजावट करण्यात आली आहे, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सुटीच्या पहिल्या दिवशी सुमारे ३.५ कोटी लोकांनी प्रवास केला. सर्वाधिक १.८ कोटी लोकांनी रेल्वेने प्रवास केला. १.२ कोटी नागरिकांनी विमान प्रवास केला, तर ५० लाख लोक महामारीच्या भीतीने खासगी वाहनांतून भटकले.

१ ऑक्टोबर १९४९ रोजी नामकरण - पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना
१९१२ मध्ये क्विंग राजेशाहीचा अंत झाला आणि रिपब्लिक ऑफ चीनची स्थापना झाली. येथूनच चीनचा आधुनिक इतिहास सुरू झाला. १९३६ मध्ये जपानी हल्ल्याविरोधात चीनने बळकटीने युद्ध लढले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर १९४५ मध्ये जपानने शरणागती पत्करली तेव्हा चीनमध्ये कम्युनिस्ट व राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष वाढला होता. तेव्हा चीनमध्ये चार वर्षे गृहयुद्धासारखी स्थिती होती. या युद्धात चीनमधील लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १ ऑक्टोबर १९४९ रोजी माआे त्से तुंग यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या विजयाची घोषणा केली. त्यानंतर संविधानात देशाचे नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असे नमूद करण्यात आले. म्हणूनच ऑक्टोबरचा पहिला आठवडा चीनमध्ये महत्त्वाचा मानला जातो.