आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनसाठी लढणाऱ्या 3 परदेशींना 'सजा-ए-मौत':रशिया पुरस्कृत कोर्टाचा फैसला; पुतीन यांनी स्वतःची तुलना पीटर द ग्रेटशी केली

कीव्ह/मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मदत करणाऱ्या 3 जणांना रशियन न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. युक्रेनमधील रशियन समर्थक डोनबास स्थित न्यायालयाने हा निर्णय दिला. पण, या न्यायालयाला अद्याप आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे ब्रिटन व युक्रेनने हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.

हे न्यायालय डोनेत्सकमध्ये आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युद्धाच्या सुरुवातीलाच हा भाग स्वतंत्र म्हणून घोषित केला होता. ब्रिटनचे नागरिक एडन ऑसलिन व शॉन पिनर यांच्यासह मोरक्कोच्या ब्राहिम सौदून यांच्यावर व्यावसायिक खुनी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. याशिवाय त्यांना लष्करी क्रियाकलाप व दहशतवादाप्रकरणीही दोषी घोषित करण्यात आले आहे.

न्यायालयाने या तिघांनाही गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिलेत. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी त्यांना महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे.
न्यायालयाने या तिघांनाही गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिलेत. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी त्यांना महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे.

सुटकेचे प्रयत्न सुरू

न्यायालयाचा फैसला आल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, ब्रिटीश सरकारनेही आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युक्रेनसोबत मिळून प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या -या फैसल्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. एडने ऑसलिन व शॉन पिनर यांच्या कुटुंबियांनीही हे दोघे 2018 पासून युक्रेनमध्ये राहून तेथील लष्कराला सेवा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

रशियन सैनिकांपुढे केले होते आत्मसमर्पण

​​​​​​​पिनर व ऑसलिन यांनी एप्रिल महिन्यात युक्रेनच्या मारियुपोलमध्ये रशियन समर्थक सशस्त्र दलांपुढे आत्मसमर्पण केले होते. तर ब्राहिम यांनी मार्चमध्ये युक्रेनच्या व्होलनोव्हखा शहरात आत्मसमर्पण केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे रशियन सैनिकांनी यापूर्वी आपण युक्रेनसाठी लढणऱ्या कोणत्याही परदेशी सैनिकांना पकडले नसल्याचा दावा केला होता. पण, या घटनेमुळे तो फोल ठरला.

पुतीन यांनी स्वतःची तुलना रशियाच्या पहिल्या राजाशी केला

पीटर द ग्रेटने 18 व्या शतकात बाल्टिक किनाऱ्यावर स्वीडनविरोधातील युद्ध जिंकले होते. विजयानंतर रशिया बाल्टिक समुद्रातील प्रमुख महासत्ता व यूरोपियन प्रकरणांतील एक महत्वाचा खेळाडू म्हणून पुढे आला होता.
पीटर द ग्रेटने 18 व्या शतकात बाल्टिक किनाऱ्यावर स्वीडनविरोधातील युद्ध जिंकले होते. विजयानंतर रशिया बाल्टिक समुद्रातील प्रमुख महासत्ता व यूरोपियन प्रकरणांतील एक महत्वाचा खेळाडू म्हणून पुढे आला होता.

दुसरीकडे, युक्रेनला उद्ध्वस्त करण्याचे आदेश देणाऱ्या पुतीन यांनी स्वतःची तुलना रशियाचे महान राजे पीटर यांच्याशी केली आहे. ते म्हणाले - "जेव्हा पीटर द ग्रेट यांनी सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली आणि त्याला रशियन राजधानी घोषित केले तेव्हा युरोपमधील कोणत्याही देशाने या प्रदेशाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता दिली नव्हती. रशियाने आपले प्रदेश परत घेणे आणि स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे." त्यांचा इशारा युक्रेनकडे होता.

बातम्या आणखी आहेत...