आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक लष्करात बंड?:पंतप्रधानांच्या बैठकीला नेव्ही-एअर चीफ गैरहजर; ​​​​​​​पीएम शरीफांचा पक्ष इम्रान यांच्या सुटकेविरुद्ध करणार आंदोलन

दिव्य मराठी नेटवर्क | इस्लामाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन्ही प्रमुखांची बैठकीत सहभागास असमर्थता
माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक व पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावरून पाकच्या संरक्षण दलात फूट पडली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी शुक्रवारी बोलावलेल्या नॅशनल सिक्युरिटी काैन्सिलच्या (एनएससी) बैठकीपासून नौदल प्रमुख अॅडमिरल अमजद खान नियाजी आणि एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर दूरच राहिले.

दोन्ही प्रमुखांनी बैठकीत सहभागी होण्यात ‘असमर्थता’ दर्शवल्याने शरीफ यांना बैठक पुढे ढकलावी लागली. हा घटनाक्रम शरीफ सरकार व मुनीर प्लॅनसाठी मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. शरीफ आणि मुनीर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दडपशाहीचा मोठे हत्यार म्हणून वापर करू इच्छित आहेत.
सत्तेत येताच लष्करप्रमुख मुनीर यांना हटवणार : इम्रान
आमच्या टार्गेटवर लष्करप्रमुख मुनीर व आयएसआय प्रमुख मेजर जनरल फैसल नासिर असल्याची घोषणा इम्रान यांनी केली. ते म्हणाले, माझ्या अटकेमागे यांचाच हात आहे. सत्तेत येताच या दोघांना पदावरून हटवले जाईल. वस्तुत: हे दोघेही माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे निकटवर्तीय आणि इम्रान यांचे कट्टर विरोधक असल्याचे म्हटले जाते.

‘नेतृत्वाचा निर्णय जनतेने मतपेटीद्वारे केला पाहिजे’
नौदल व एअर चीफ यांचे म्हणणे होते की, आम्ही राजकारणापासून दूर राहू इच्छितो. इम्रान खटल्याबाबत कोर्ट व नेतृत्वाच्या प्रश्नावर जनतेेने मतपेटीद्वारे उत्तर द्यावे. लष्कराला ज्या स्थितीचा सामना करावा लागत आहे तो लष्कराच्या ढासळत्या प्रतिमेचा परिणाम आहे. एप्रिलमधील एनएससीच्या बैठकीत दोघांनी कोर्टाच्या आदेशने निवडणूक घेण्याचे समर्थन केले होते.

जमावावर गोळीबाराचे आदेश दिले नाही, म्हणून लष्कराच्या कमांडरची बदली...
इम्रान यांच्या अटकेनंतर संतप्त जनतेवर कठोर कारवाई न केल्याबद्दल लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी चौथ्या कोअरचे कमांडर ले. जनरल सलमान फयाज गनी यांची बदली रावळपिंडीतील लष्कर मुख्यालयात केली. सूत्रांनुसार, एका ब्रिगेडियरची व एका कर्नलचीही बदली करण्यात आली. लाहोरमध्ये शासकीय निवासस्थात घुसलेल्या जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले नसल्याचा गनी यांच्यावर आरोप आहे. जमावाने नंतर रावळपिंडी व इस्लामाबादेतही लष्कराच्या मालमत्तेची नासधूस केली होती. गनी यांचे निवासस्थान एकेकाळी पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांचे निवासस्थान होते.

इम्रान यांना दिलासा : अटकेवर 15 मेपर्यंत बंदी, रात्री उशिरा इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर गोळीबार

इस्लामाबाद | इस्लामाबाद हायकोर्टाने शुक्रवारी इम्रान खान यांना मोठा दिलासा दिला आहे. कादिर ट्रस्ट, तोशाखानासह इम्रान यांना पाच प्रकरणांत जामीन देण्यात आला आहे. इम्रान यांना या प्रकरणांमध्ये १५ मेपर्यंत अटक करता येऊ शकणार नाही. तसेच त्यांना ९ मेनंतर दाखल गुन्ह्यांमध्ये १७ मेपर्यंत अटक करता येणार नाही. दरम्यान, रात्री उशिरा इस्लामाबाद हायकोर्ट परिसराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या वेळी इम्रान कोर्ट रूममध्ये होते. सुमारे तीन तासांनंतर इम्रान पोलिस बंदोबस्तात रवाना झाले.