आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये गौप्यस्फोटाने राजकारण तापले:नवाझ यांनी रचला इम्रान यांना मारण्याचा कट, सत्ताधारी पक्षाच्या माजी प्रवक्त्याचा आरोप

इस्लामाबाद / नासिर अब्बास13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये सनसनाटी दाव्यामुळे राजकारण तापले आहे. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाच्या लंडन शाखेचे कथित प्रवक्ता तसनीन हैदर शाह यांनी एक आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या हत्येचा कट लंडनमध्ये नवाझ शरीफ यांच्याकडून रचण्यात आला होता. त्याशिवाय पत्रकार अशरद शरीफ हत्येच्या कटामागेही त्यांचा हात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, पीएमएल-एनचे प्रमुख शरीफ यांच्यासोबत माझ्या लंडनमध्ये तीन बैठका झाल्या होत्या. पहिली बैठक ८ जुलै, दुसरी २० सप्टेंबरला व तिसरी २९ ऑक्टोबरला झाली होती. नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीपूर्वी अशरद शरीफ व नंतर इम्रान खान यांची हत्या करण्यास सांगण्यात आले होते. तसनीनच्या म्हणण्यानुसार या बैठकीची छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. या कटाची माहिती ब्रिटिश पोलिसांना देण्यात आली होती.

कोर्टात खेचू : मरियम कटाचा आरोपावर इम्रान यांचा पक्ष पीटीआयने चौकशीची मागणी केली आहे. पक्षाचे नेते फवाद चौधरी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात दखल घ्यावी. माहिती प्रसारण मंत्री मरियम आैरंगजेब म्हणाल्या, तसनीनचा पीएमएल-एनशी काहीही संबंध नाही. तो लंडनमध्ये प्रवक्ता देखील नाही. तसनीनच्या विरोधात ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल करू. विश्लेषक अली फुरकान म्हणाले, आता एका अज्ञात प्रवक्त्याद्वारे तीनवेळचे माजी पंतप्रधानांवर आरोप करणे समजण्यापलिकडचे आहे. हा राजकीय स्टंट वाटतो.

बातम्या आणखी आहेत...