आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेपाळ सरकारने 13 मे रोजी होणाऱ्या स्थानिक निवडणुकांपूर्वी भारत आणि चीनसोबतच्या सीमा 72 तासांसाठी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर सरकारने 10 मे पासून 13 मे पर्यंत देशाच्या सुरक्षा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेपाळचे गृहमंत्रालयाचे प्रवक्ता फणींद्र मणि पोखरेल यांनी सांगितले की, आयोगाच्या शिफारशीला लागू करण्यासाठी भारत-चीन सीमेवरील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाची माहिती देण्यात आली आहे.
एवढेच नाही तर निवडणुकीच्या दिवशी बचाव आणि मदत उड्डाणे वगळता सर्व देशांतर्गत विमानसेवा देखील बंद राहणार आहेत. नेपाळची भारताशी सुमारे 1,880 किमी आणि चीनशी सुमारे 1,414 किमीची सीमा आहे.
5 मे रोजी नेपाळमधील विराटनगर येथील एका हॉटेलमध्ये भारत-नेपाळ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या 72 तास आधी भारत-नेपाळ सीमा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत-नेपाळ समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत नेपाळच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक किंवा विध्वंसक घटकांना सीमा ओलांडून निवडणुकीत अडथळा होऊ नये, म्हणून सीमेवर आणि दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांनी संयुक्तपणे गस्त घालण्याचा निर्णय घेतला.
भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात पेट्रोलिंग
महापालिका निवडणुकीसाठी भारतालगतच्या सीमावर्ती भागात पोलिसांची कडक गस्त मोहीम राबविण्यात येत आहे. सीमावर्ती पोलिस ठाण्यांना सतर्क करण्याबरोबरच ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबवली जात आहे. विविध चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीबाबत लोकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला असून उमेदवारांनीही ताकद लावली आहे. उमेदवारांच्या वतीने घरोघरी प्रचार केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.