आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ सरकार म्‍हणते:अग्निपथमध्ये गोरखांची भरती करू नये

काठमांडू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निपथ योजनेअंतर्गत गोरखा रेजिमेंटमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात नेपाळींची भरती केली जाऊ नये. त्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती नेपाळ सरकारने भारताकडे केली आहे. सेवा पूर्ण झाल्यानंतर गोरखा अग्निवीरांना नेमके काय मिळणार आहे हे भारत सरकार स्पष्ट करत नाही तोपर्यंत गोरखा रेजिमेंटमधील भरती थांबवावी. स्वातंत्र्यापासूनच भारतीय लष्कराच्या रेजिमेंटमध्ये पर्वतरोहणात निष्णात असलेल्या नेपाळी नागरिकांची भरती होत आली आहे. इंग्रजही १८१५ पासून आपल्या सैन्यात गोरखांचा समावेश करत होते. ही प्रथा भारताच्या स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिली.

बातम्या आणखी आहेत...