आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ:रुग्णांकडून हमीपत्र : ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्यास रुग्णालय जबाबदार नाही!

काठमांडू / अभय राज जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेपाळमध्ये खाटा मिळवण्यासाठी लोकांना मृत्यूची प्रतीक्षा

सामान्य दिवसांत पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरात बागमती नदीच्या किनारी एका दिवसात एक डझन कुटुंब आपल्या नातेवाइकांवर दहनसंस्कार करतात. परंतु अलीकडे चित्र बदलून गेले आहे. पांढरे पीपीई परिधान केलेले नेपाळी सैनिक प्लास्टिक बॅगमधून आलेल्या पार्थिवाला बाहेर काढून शेकडो मृतदेहांना मुखाग्नी देत आहेत. शोकाकुल कुटुंबे अंतिम प्रवासाला निघालेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा देखील पाहू शकत नाहीत. मृत्यूची संख्या वाढत असल्याने नदीच्या किनारी अंत्यसंस्कारासाठी ५१ नवे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये ८० टक्के हिंदू समुदाय आहे. भारतासोबत सरहद्द असलेल्या या देशाला कोविडच्या दुसऱ्या लाटेस तोंड द्यावे लागत आहे. नेपाळमधील स्थिती अत्यंत भयंकर आहे. भारतातील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत, असे तज्ञांनी सांगितले.

चिंता : भारताने काेविशील्ड दिली, दक्षिण आशियात लसीकरण सुरू करणारा दुसरा देश, स्थिती बिघडली
नेपाळ दक्षिण आशियात लसीकरण सुरू करणारा दुसरा ठरला. भारताने कोविशील्डचे एक कोटी डोस दिले होते. तेव्हा पंतप्रधान आेली म्हणाले होते-तीन महिन्यांत प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नेपाळने ठेवले होेते. सरकारने भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला २० लाख डोसची ऑर्डर दिली होती. परंतु कंपनीने १० लाख डोस दिले.रुग्णालय प्रशासन जबाबदारी झटकू लागल्याचे दिसून आले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यास रुग्णालय जबाबदार राहणार नसल्याचे हमीपत्र रुग्णांकडून भरून घेतले जात आहे.

आशा : नेपाळमध्ये भारतातील पीकची प्रतीक्षा, संसर्ग कमी झाल्यानंतर लस मिळण्याची अपेक्षा
सरकारकडे सर्वांचे लसीकरण करण्यासाठी पुरेसा साठा नाही. कारण दुसऱ्या लाटेत सापडल्यानंतर भारताने निर्यात रोखली. भारतातील स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत, असे तज्ञांनी सांगितले. कारण भारतात सक्रिय रुग्ण वाढल्याबरोबर नेपाळमध्ये हे प्रमाण प्रचंड वाढते. पहिल्या लाटेवेळी भारतात पीक आल्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नेपाळमध्ये पीक आला होता. भारतात संसर्ग कमी होणे म्हणजे भारत नेपाळला पुन्हा लसींची निर्यात करू शकेल. चीन, अमेरिका, ईयू नेपाळला मदत देत आहेत. परंतु ते लस उपलब्ध करून देत नाहीत.

- लसींचा पुरवठा थांबल्याने लसीकरण थांबले, पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळत नाही - तज्ज्ञ म्हणाले- लसीकरण कमी, डेटा व्यवस्थापन कमकुवत, स्थिती-५-१० पट - नेपाळमध्ये दयनीय स्थिती...१० लाख लोकसंख्येपैकी ३०४ रुग्ण, भारतात हा आकडा २४० - रुग्णालयात जागा मिळावी यासाठी लोक रुग्णाच्या मृत्यूची प्रतीक्षा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...