आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Nepal India Border Dispute News Updates | Nepal Asserted His Right To Indian Territory, Which Was Also Approved By The President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त नकाशा:भारताच्या भूभागावर दाखवला स्वत:चा हक्क, नेपाळच्या राष्ट्रपतींनीही दिली मंजुरी

काठमांडू/ नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आक्षेपांकडे दुर्लक्ष करत संसदेने दिली होती मंजुरी

भारताचा आक्षेप असतानाही नेपाळचे वरिष्ठ सभागृह अर्थात नॅशनल असेंब्लीने नव्या नकाशाला मंजुरी दिली. दरम्यान, संसदेमध्ये हे दुरुस्ती विधेयक मंजूर होताच राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनीही या नकाशाला मंजुरी दिली आहे. ५७ सदस्यांच्या वरिष्ठ सभागृहाने भारत-चीनदरम्यान सीमावाद वाढला असतानाच एकमताने या नव्या नकाशाला मंजुरी दिली होती. हे घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनीही त्याला मंजुरी दिली.

गेल्या आठवड्यातच सत्तारूढ के. पी. ओली सरकारने याबाबतच्या प्रस्तावाला आधी प्रतिनिधी सभेत मंजुरी दिली होती. या नकाशात नेपाळने भारताचा कालापाणी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हा भाग नेपाळचा भाग असल्याचे दाखवले आहे. भारताने या नकाशावर आक्षेप घेत तो नेपाळ सरकारकडे नोंदवला होता. नेपाळ सरकारच्या या दाव्यात ऐतिहासिक तथ्य तर नाहीच, शिवाय त्याला तथ्यात्मक आधारही नाही. त्यामुळे हा नकाशा अधिकृत ठरत नाही, असे भारताने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...