आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Nepal PM Oli Tells Madi Delegation To Build Ram’s Idol And Promote Ayodhyapuri As Lord Ram's Place Of Birth

नेपाळमध्ये भगवान रामाची प्रतिमा:पीएम ओलींचा आदेश- नेपाळमधील अयोध्यापुरीला रामाचे जन्मस्थान म्हणून प्रमोट करा

काठमांडूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओली म्हणाले- भगवान रामांचा नेपाळमध्ये जन्म झाल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी परत एकदा भगवान रामांचा नेपाळच्या चितवन जिल्ह्यात जन्म झाल्याचा दावा केला आहे. या जिल्ह्यात माडी नगरपालिका क्षेत्र आहे. या क्षेत्राचे नाव अयोध्यापुरी आहे. शनिवारी ओली यांनी या क्षेत्रातील अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी ओली यांनी भगवान राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मुर्ती लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अयोध्यापुरीलाच रामाचे खरे जन्मस्थान म्हणून प्रमोट केले जावे.

नेपाळमधील वृर्तमानपत्र ‘हिमालयन टाइम्स’ने सांगितल्यानुसार ओली यांनी माडी आणि चितवनच्या अधिकारी आणि नेत्यांशी दोन तास फोनवर चर्चा केली. पुढील चर्चेसाठी त्यांना काठमांडुला बोलवण्यात आले. ओली म्हणाले की, मला विश्वास आहे की, भगवान रामाचा जनाम नेपाळच्या अयोध्यापुरीमध्ये झाला होता. भगवान रामाचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत.

खोदकाम करुन पुरावे गोळा करण्यास सांगितले

चितवन जिल्ह्याच्या खासदार दिल कुमारी रावल म्हणाल्या की, पंतप्रधानांनी म्हटले की, चितवन जिल्ह्यातील आसपासच्या क्षेत्राचे संरक्षण केले जावे. तसेच, रामाचा जन्म नपाळमध्ये झाल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी खोदकामही करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...