आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भारत-नेपाळ सीमावाद:नेपाळकडून संसदेत नकाशा सादर; भारताच्या 395 वर्ग किमीवर दाखवला आपला दावा!

नवी दिल्ली/काठमांडू2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • नव्या नकाशात ३९५ वर्ग किलोमीटर भारतीय भाग, लिंकरोडमुळे वाढला वाद

नेपाळने भारतातील मोठ्या भागावर दावा करत नकाशातील बदलाशी संबंधित विधेयक रविवारी संसदेत सादर केले. या नकाशा मध्ये भारतातील तीन भागांना त्यांनी आपल्या सीमेमध्ये दाखविले आहे. काळापाणी, लिंपियाधुरा आणि लिपूलेख हे ते तीन भाग असून ते सुमारे ३९५ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहेत. सीमा विवाद हा चर्चेतून सोडविला जावा यासाठी भारताने नेहमी पुढाकार घेतला आहे.

पहिले हे विधेयक बुधवारी संसदेमध्ये सादर करण्यात येणार होते. परंतु, नेपाळी काँग्रेसच्या सांगितल्यानुसार सदनाच्या कार्यवाही सूचीतून हे विधेयक हटविले गेले. कारण पार्टीला सीडब्ल्यूसीच्या बैठकीत यावर निर्णय घ्यायचा होता. मुख्य विरोधी पक्षाने नेपाळी काँग्रेसचे समर्थन असल्याचे जाहीर करत रविवारी केपी शर्मा ओली सरकारचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री शिवमाया तुंबाहांगफे यांनी रविवारी हे विधेयक सादर केले. संविधानातील हे दुसरे संशोधन आहे. या विधेयकातून देशाच्या देशाचा राजनैतिक नकाशा आणि राष्ट्रीय प्रतिकाला बदलले जात आहे. नेपाळी संविधानामध्ये संशोधन करण्यासाठी संसदेमध्ये दोन तृतियांश मतांचे समर्थन आवश्यक असते. संसदेमध्ये चर्चा आणि मंजुरीनंतर राष्ट्रपती यावर स्वाक्षरी करतील.

नव्या नकाशात ३९५  वर्ग किलोमीटर भारतीय भाग 

नेपाळने नुकताच नवा राजनैतिक आणि प्रशासकीय नकाशा जारी केला होता. यामध्ये भारताच्या ३९५ वर्ग किलोमीटर भागाचा समावेश केला आहे. यामध्ये राजनैतिक दृष्ट्या महत्वाचे लिंपियाधुरा, लिपूलेख आणि काळापाणी याशिवाय गुंजी, नाभी आणि कुटी  या गावांचा देखील समावेश करण्यात आला आहे.भारताने याचा विरोध करत म्हटले आहे की भूभागावर एकतर्फी दाव्याला स्वीकार केले जाणार नाही. 

लिंकरोडमुळे वाढला वाद

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिपूलेखपासून कैलास-मानसरोवरला जाणाऱ्या लिंक रोड चे उद्घाटन केल्यानंतर नेपाळने याला विरोध केला होता. त्यानंतर १८  मे रोजी नेपाळने नव्या नकाशामध्ये ही हरकत केली. भारताने स्पष्ट म्हटले होते की नेपाळने भारताची संप्रभुता आणि क्षेत्रीय अखंडतेचा सन्मान केला पाहिजे. तेथील नेतृत्वाने असे वातावरण बनविले पाहिजे की त्यानुसार बसून यावर चर्चा करता येईल. 

0