आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ संसदीय निवडणूक:नेपाळी काँग्रेस आघाडीने जिंकल्या सर्वाधिक 57 जागा

काठमांडू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळच्या संसदीय निवडणुकीत पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांचा पक्ष नेपाळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीचे उमेदवार धनराज गुरुंग यांनी सियांग्झा मतदारसंघ क्र.२ मध्ये विजय प्राप्त केला आहे. यामुळे आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुंग यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी सीपीएनच्या(यूएमएल) पद्माकुमारी आर्यल यांना हरवले. गुरुंग यांना ३१,४६६ मते मिळाली तर कुमारी या २५,८३९ मते मिळवू शकल्या. यासोबत नेपाळी काँग्रेस थेट निवडणुकीअंतर्गत प्रतिनिधी सभेत ५७ जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर आली आहे. यानंतर सीपीएन-यूएमएल ४४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...