आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-नेपाळ सीमावाद:नेपाळच‌े पंतप्रधान ओली नरमले, जुना नकाशा केला शेअर; विरोधकांनी सोडले टीकस्त्र

काठमांडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरवणे पुढील महिन्यात नेपाळला जाणार

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर स्वत:च्या फोटोसोबत नेपाळचा जुना नकाशा शेअर केला. ज्यात कालापानी, लिपुलेख व लिम्पियाधुराचा समावेश नाही. भारताची गुप्तचर यंत्रणा रॉचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांची भेट घेतल्यापासून ओली नरमले आहेत. गोयल यांनी बुधवारी रात्री ओलींची भेट घेतली होती. तसेच भारताचे लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे हेही पुढील महिन्यात नेपाळचा दौरा करणार आहेत.

दरम्यान, जुना नकाशा शेअर केल्यामुळे पंतप्रधान ओलींवर विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. पंतप्रधानांनी संसदेजवळ असलेल्या नकाशाचा वापर करायला हवा. ओलींचे हे पाऊल देशहितात नसल्याची टीका नेपाळमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते गगन थापा यांनी केली. नेपाळने २० मे रोजी नवीन नकाशा जारी केला होता. त्यात भारतातील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुराचा समावेश होता.