आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलमध्‍ये कट्टरवादी गटाच्या मदतीने सरकार स्थापन होणार:नेतन्याहू विजयाच्या दिशेने; सरहद्दीवर भिंत उभारणार

जेरुसलेम / अरीए कोवलर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीतील मतमोजणी सुरू आहे. ८५ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली. सुरुवातीचा कौल लक्षात घेता माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीचा विजय होऊ शकतो. ते कट्टरवादी गट तसेच रूढीवादी ज्यू समुदायाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करू शकतात. नेतन्याहू गटाला ६५ जागी विजय मिळू शकतो. हा आकडा विजयासाठी लागणाऱ्या ६१ पेक्षा जास्त आहे. ४० पक्षांना सरासरी ३.२५ टक्केही मते मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना सिनेट गाठता येणार नाही. नेतन्याहू विजयी झाल्यास पॅलेस्टाइनला रोखणाऱ्या भिंतीला उभारणीच्या कामाला गती येऊ शकते. देशाच्या दक्षिणेकडील भिंतीमुळे घुसखोरी थांबल्याचे नेतन्याहूंनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.

नेतन्याहूंच्या आघाडीत केवळ ८ महिला नेतन्याहूंच्या गटात केवळ ८ महिला आहेत. कारण रूढीवादी घटक पक्ष महिलांना तिकीट देत नाहीत. विद्यमान सरकारमध्ये मात्र ३० महिला आहेत. डूज अल्पसंख्याक समुदायातील एकही उमेदवार निवडणुकीत उतरला नाही. तीस वर्षांत असे पहिल्यांदाच घडले.

65 जागी नेतन्याहूंच्या आघाडीला विजय मिळू शकताे. 24 जागांवर लॅपिडच्या येश अतिद पार्टी विजयी होणे शक्य.

दोषी नेत्याची मंत्रिपदाची मागणी धार्मिक जियोनिझम पार्टीचे नेते व नेतन्याहू यांच्या आघाडीतील सहकारी बेन ग्वीर यांनी नूतन सरकारमध्ये अंतर्गत सुरक्षा मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या ताब्यात पोलिस विभाग येईल. २००७ मध्ये ते वंशवादाच्या प्रकरणात दोषी ठरले होते. ते दहशतवादी गटाचे समर्थकही राहिले आहेत.

भारतासोबतचे संबंध बळकट होतील नेतन्याहू पंतप्रधान झाल्यास भारत व इस्रायल यांच्यातील व्यापार, तंत्रज्ञानाच्या पातळीवरील संबंध बळकट होऊ शकतात. उभय देशांत मुक्त व्यापार सुरू होऊ शकतो. नेतन्याहू व मोदी यांच्यातील संबंधही चांगले राहिलेले आहेत. इस्रायलचा दौरा करणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत.

बातम्या आणखी आहेत...