आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या PM:38 मिनिटे ब्रिटन पंतप्रधानांशिवाय राहिले; ऋषी सुनक यांना मंत्रिमंडळात स्थान नाही

लंडन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिझ ट्रस या ब्रिटनच्या 56व्या पंतप्रधान बनल्या आहेत. मंगळवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे त्यांना राणी एलिझाबेथ यांनी पदाची शपथ दिली. हा कार्यक्रम लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये होतो, परंतु महाराणी सध्या स्कॉटलंडमध्ये आहेत. 96 वर्षीय महाराणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे स्कॉटलंडमध्ये नव्या पंतप्रधानांचा शपथविधी पार पडला.

या शपथविधीमधील विशेष बाब म्हणजे लिझ यांनी 1994 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा उघड विरोध केला होता, त्याच राणीसमोर शपथ घेतली. राजेशाहीला विरोध करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधानांनाही राणीने पंतप्रधानपदाचा शिक्का दिला हे विशेष.

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ऋषी सुनक यांना ट्रस कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार नाही. सर्वांची नावे निश्चित झाली आहेत. सर्व कृष्णवर्णीय खासदारांच्या नावांचा उल्लेख टॉप 4 पदांवर करण्यात आला आहे. सुनक हे जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री होते. कोविडच्या काळात ब्रिटनला संकटातून बाहेर काढल्याबद्दल जगात त्यांचे कौतुक झाले होते.

तत्पूर्वी, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान म्हणून शेवटचे भाषण पीएम हाऊस 10 डाउनिंग स्ट्रीटवरून केले. यामध्ये परत येण्याचा विश्वास दिला. त्यानंतर पत्नी कॅरी यांच्यासोबत ते स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलला पोहोचले. महाराणीकडे राजीनामा सुपूर्द केला.

जवळपास 38 मिनिटे ब्रिटन पंतप्रधानांशिवाय राहिले
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, लिझ आणि जॉन्सन स्कॉटलंडमध्ये महाराणीला भेटण्यासाठी स्वतंत्र विमानाने पोहोचले. जॉन्सन राजीनामा देणार होते आणि लिझ यांना नियुक्ती पत्र मिळणार होते. येण्या-जाण्याचा प्रवास सुमारे 13 किलोमीटरचा आहे.

प्रथम जॉन्सन आणि पत्नी कॅरी राणीकडे पोहोचले. राजीनामा दिला आणि पंतप्रधान केल्याबद्दल महाराणीचे आभार मानले. यानंतर सुमारे 38 मिनिटांनी लिझ पोहोचल्या. नियुक्तीचे पत्र घेतले आणि राणीचे आभार मानून हस्तांदोलन केले. जॉन्सन यांचा राजीनामा आणि लिझ यांची नियुक्ती दरम्यानच्या काळात ब्रिटनला पंतप्रधान नव्हते.

ब्रिटीश पंतप्रधानांचा शपथविधी सामान्यतः लंडनच्या बकिंघम पॅलेसमध्ये होतो. पण यावेळी तो स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये होईल. क्वीन सध्या स्कॉटलंडमध्ये आहेत.
ब्रिटीश पंतप्रधानांचा शपथविधी सामान्यतः लंडनच्या बकिंघम पॅलेसमध्ये होतो. पण यावेळी तो स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये होईल. क्वीन सध्या स्कॉटलंडमध्ये आहेत.

लिझ यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा केला पराभव

47 वर्षीय लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांचा 20 हजार 927 मतांनी पराभव केला आहे. लिझ ब्रिटनच्या राजकारणातील फायरब्रँड नेत्या आहेत. सोमवारी विजयाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी सुनक यांची तोंडभरून प्रशंसा केली. सुनक यांच्यासारखे नेते माझ्या पक्षात आहेत ही माझ्यासाठी नशिबाची गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

लिझ यांना 21 वर्षांतील सर्वात कमी मते

मीडिया व सर्व्हेत पूर्वीपासूनच लिझ यांच्या मोठ्या विजयाचे भाकित वर्तवण्यात आले होते. पण निकाल वेगळाच आला. 2001 नंतर प्रथमच ब्रिटनच्या एखाद्या पंतप्रधानाला 60 टक्क्यांहून कमी मते मिळाली. लिझ यांना पक्ष सदस्यांचे अवघे 57 टक्के मते मिळाली. सुनक यांना 42.6 टक्के मते मिळाली. 2019 मध्ये बोरीस जॉन्सन यांची पीएमपदी निवड झाली तेव्हा त्यांना 66.4 टक्के मते मिळाली होती.

तत्पूर्वी, 2005 मध्ये डेव्हीड कॅमरून यांना 67.6, 2001 मध्ये डंकन स्मिथ यांना 60.7 टक्के मते मिळाली होती. थेरेसा यांना मेंबरशिप बॅलेट म्हणजे पक्ष सदस्यांच्या मतदानाची गरज पडली नाही. कराण, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आंद्रिया लीडसॉम यांनी पहिल्या फेरीनंतर पराभव स्वीकारला होता.

लिझ तिसऱ्या महिला पंतप्रधान

लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांच्या पूर्वी मार्गारेट थॅचर व थेरेसा या पदावर राहिल्या. लिझ मार्गारेट थॅचर यांना आपले आदर्श मानतात.

बातम्या आणखी आहेत...