आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीचा विळखा आता जगभरात सैल होत आहे. परंतु अजूनही तो पूर्णपणे दूर झालेला नाही. आकडेवारीनुसार काही देशांत अद्यापही संसर्गाचा वेग वाढत आहे. परंतु अनेक देशांत नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. अशी घट झालेल्या देशांत भारताचाही समावेश आहे.
जगातील १८८ देशांत गेल्या दोन आठवड्यांत काही देशांत संसर्गाचा वेग दिसतो. भारतात गेल्या आठवड्यादरम्यान एक लाख लोकांमागे १५ लाख बाधित आढळले. ९ मे २०२१ सर्वोच्च संसर्गाच्या तुलनेत ८ टक्के संसर्ग दिसून येत आहे. हा ट्रेंडही आता उतरणीला आहे. दक्षिण कोरिया शनिवारी पहिल्यांदा बाधितांची संख्या ३ हजारपार गेली आहे. कोरियात तीन दिवसांचा सुटी होती, असे सांगण्यात येते. या काळात लोक सार्वजनिक ठिकाणी भ्रमण करताना दिसून आले. त्यामुळे संसर्गात भर पडली. कोरियात नागरिकांत बेपर्वाई मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
१८८ देशांतील संसर्गाची स्थिती
9 देशांत दुपटीवर रुग्ण (चीन, सिंगापूर, रोमानिया इत्यादी)
58 देशांत रुग्ण्संख्या स्थिर (लायबेरिया,चिली, बेल्जियमचा समावेश)
87 देशांत नवे रुग्ण कमी (भारत, ब्रिटन, अमेरिका)
23 देशांत निम्म्यांहून कमी नवे रुग्ण (जपान, अर्जेंटिना, न्यूझीलंड)
6 देशांत नवा रुग्ण नाही (लेसोथो, व्हॅटिकन, मार्शल आयलँड)
अमेरिकेत कर्मचाऱ्यांना ८ डिसेंबरपर्यंत डोस अनिवार्य
अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडेन यांनी आदेश काढला आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपर्यंत डोस घेणे बंधनकारक केले. आजारामुळे अनुपस्थिती कमी करणे, खर्च कमी करणे, कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेमध्ये वाढ करणे असा यामागील उद्देश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.