आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेतील सेंटर्स फाॅर डिसीज कन्ट्राेल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) देशात काेराेना संसर्ग वाढीबाबतचा गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेत मार्चपर्यंत ही संख्या प्रचंड वाढू शकते. ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा स्ट्रेन या संसर्गाला कारणीभूत ठरेल, असे या इशाऱ्यात म्हटले आहे. आधीच अमेरिकेत रुग्णांवरील उपचारांसाठी सुविधांचा तुटवडा जाणवत असताना नवे संकट येण्याची भीती आहे. दुसरीकडे अमेरिकेत काेराेनामुळे झालेल्या मृतांची संख्या ४ लाखांहून जास्त झाली आहे. शुक्रवारी देशात एकूण बाधितांचा आकडा २.४१ काेटी व मृतांची संख्या ४,०१,८५६ हाेती.
अमेरिकेत लसीकरण कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यातच नव्या स्ट्रेनमुळे संसर्ग वाढ आहे, ही बाब तज्ज्ञांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. अजूनही अमेरिकेत दरराेज २.३५ लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. नवा स्ट्रेन पसरल्याने लस घेण्यासाठीही लाेकांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येते. सीडीसीचे उपसंचालक जे. बटलर म्हणाले, नवा स्ट्रेन पहिल्यापेक्षा जास्त संसर्ग वाढवणारा आहे. त्यामुळे आमच्या चिंता वाढल्या आहेत. आगामी काही दिवसांत हा स्ट्रेन देशातील संसर्ग आणखी वाढवू शकताे. आम्ही दक्ष राहण्यासाठी गजर करत आहाेत. महामारी अद्यापही संपलेली नाही, हे आम्हाला लाेकांना सांगायचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
लसीकरणात वेग, पुरवठा मंद गतीने, दुसऱ्या डाेसमध्ये अडचण शक्य
अमेरिकेत लसीकरणाचा वेग जास्त आहे. परंतु लसीचा पुरवठा मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या डाेसचे संकट आेढवले जाऊ शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात डाेस देण्याचा वेग चांगला आहे. ती लाेकांपर्यंत जातेय. परंतु दुसऱ्या टप्प्यातील लाखाे लाेकही आता प्रतीक्षेत आहेत. सुरुवातीला सरकारकडे ५ लाख डाेस हाेते. परंतु आता किती साठा आहे, हे अनिश्चित आहे. लसींच्या पुरवठ्याला निश्चित करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे फायझरने म्हटले आहे. मेक्सिकाेत गेल्या २४ तासांत २१ हजार ३६६ नवे रुग्ण समाेर आले आहेत. एकाच दिवसांत बाधित एवढ्या माेठ्या संख्येने रुग्ण आढळण्याचा हा विक्रम आहे. गेल्या काही दिवसांत ११०६ लाेकांना प्राण गमवावे लागले. येथे एकूण १६ लाख ९ हजार ७३५ लाेक बाधित झाले. महामारीमुळे प्राण गमावणाऱ्या लाेकांचा आकडादेखील १ लाख ३९ हजार २२ वर पाेहाेचला.
ब्रिटन : नव्या स्ट्रेनच्या संसर्गामुळे तुलनेने दुप्पट रुग्णांवर उपचार
ब्रिटनमध्ये काेराेनाचा नवा स्ट्रेन व दुसरा टप्पा जास्त जड चालला आहे. मार्चअखेरीस काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्णालयात पाेहाेचलेल्या रुग्णांची साप्ताहिक सरासरी सुमारे २० हजार हाेती. नवा स्ट्रेन व दुसऱ्या टप्प्यात हा आकडा ३५ हजार पार गेला आहे. लंडनमध्ये नव्या स्ट्रेनमुळे सुमारे ८० टक्के नवे रुग्ण आढळले. देशात सुमारे एक चतुर्थांश रुग्ण नव्या स्ट्रेनने बाधित झाले.
सीडीसीच्या मते नव्या स्ट्रेनमुळे संसर्ग वाढल्यास देशात सर्वात जास्त संकट रुग्णालयांच्या तुटवड्याचे राहील. बहुतांश रुग्णालये व नर्सिंग हाेम आधीपासूनच फुल आहेत. मेडिकल सेंटर्स व कर्मचाऱ्यांत संसर्ग वाढल्याने सेवा देणे कठीण हाेऊ शकते. काेराेनाचा नवा स्ट्रेन आतापर्यंत ५० देशांत पाेहाेचला. साेबतच दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्येदेखील काेराेनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने चीनची चिंता वाढली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.