आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टरवाद:इस्रायलमध्ये ज्यूंसाठी नव्या मंत्रालयाची स्थापना, शालेय अभ्यासक्रम बदलला

जेरुसलेमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायलमधील बेंजामिन नेतन्याहूंचे आघाडी सरकार यंदा अनेक कट्टरवादी गटांच्या आधारावर सत्तेवर आले आहे. म्हणूनच त्यांनी मंत्रालयांचे वाटपही त्याच आधारावर केले आहे. ज्यू विचारांना जास्तीत जास्त कट्टर कसे करता येऊ शकेल, यावर भर देण्यात आला आहे. कट्टरवादी आणि आधुनिकतेपासून दूर असलेल्या नेत्यांकडे प्रमुख मंत्रालयांची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय मिशन नावाने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. पूर्व प्राथमिक शालेय स्तरावर ज्यू समर्थित इतिहासावरील अभ्यासक्रम कसा तयार केला जाईल यावर हे मंत्रालय लक्ष ठेवेल. आधी या पातळीवरील अभ्यासक्रम शिक्षण विभाग निश्चित करत होता. त्याव्यतिरिक्त ज्यू समुदायाविरोधातील आंदोलनांना हाताळण्याची जबाबदारी देखील या नवीन मंत्रालयाची राहील. हे नवीन मंत्रालय ज्यूवादी मंत्रालय आहे, असा आरोप विरोधकांनी केला. राष्ट्रीय मिशन मंत्रालयाचे नेतृत्व कट्टरवादी नेते ऑरिट स्ट्रोक करतील. अशाच प्रकारे हेरिटेज मंत्रालय कट्टरवादी नेता अमिहाई एलियाहू सांभाळतील. एलियाहूंकडे हा कारभार असेपर्यंत ते इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू शकतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. ते इतर समाजाच्या धार्मिक वास्तूंना धोका निर्माण करू शकतात.

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी वादग्रस्त मशिदीचा दौरा केला इस्रायलचे कट्टरवादी नेता व देशातील राष्ट्रीय संरक्षण मंत्री इतामार बेन-ग्विन यांनी अल-अक्सा मशिदीचा दौरा केला. येथे सध्या ज्यूंना मर्यादित प्रवेश दिला जातो. इस्रायलचे मंत्री मशिदीत गेल्याने तणावात वाढ झाली आहे. ज्यूंच्या म्हणण्यानुसार मशीद असलेल्या भागात पूर्वी मंदिर होते. त्याची मुस्लिमांनी मोडतोड केली. आता हा समुदाय तेथे पुन्हा मंदिर उभारू इच्छितो. पॅलेस्टाइनच्या हमास संघटनेने एक धमकी दिली होती. अल अक्सा मशिदीबद्दलचा इस्रायलचे कोणतेही पाऊल रेड लाइन आेलांडण्यासारखे ठरेल.

विरोध: नागरिकत्वाबाबत स्वकीयांनीच सरकारला घेरले, निर्णयास विरोध लॉ ऑफ रिटर्नमध्ये बदल करून इतर धर्मीयांशी विवाह केलेल्या जगभरातील ज्यूंना देशात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. आलियाह मंत्रालयाचे मंत्री आेफिर सोफेर म्हणाले, आई-वडील ज्यू असलेल्या लोकांनाच नागरिकत्व दिले जाईल. त्यावर अमेरिकेतील ज्यू समुदायाने आक्षेप घेतला आहे. ही लोकसंख्या आधुनिक विचारसरणीचे समर्थन करते.

भीती : माजी पीएम करू शकतात तख्तपालट, पत्रात ‘लॅपिड-२०२४’ इस्रायलमध्ये गेल्या तीन वर्षांत पाच निवडणूक झाल्या. कोणत्याही सरकारला कार्यकाळ पूर्ण करता येत नाही. यावेळी देखील हीच भीती व्यक्त केली जाते. नेतन्याहूंच्या शपथविधीनंतर माजी पंतप्रधान येर लॅपिड यांनी त्यांना हस्तांदोलनही न करता ते समारंभातून बाहेर पडले. त्यानंतर नेतन्याहूंच्या कार्यालयात टेबलवर एक चिठ्ठी होती. त्यावर ‘लॅपिड २०२४’ असे लिहिलेले होते.

बातम्या आणखी आहेत...