आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारी:युरोपात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धडक, लसीकरणाचा वेगही मंदावला; इटली, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, बेल्जियममध्ये वेगाने वाढले काेरोनाचे नवे रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोपात गेल्या आठवड्यात ८ लाख नवे रुग्ण, आधीपेक्षा ५.८% जास्त
  • युरोपात संसर्गाचा दर फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या तुलनेत उच्च पातळीवर

गेल्या मार्च-एप्रिल म्हणजे वसंत ऋतूत कोरोनाने सर्वाधिक बाधित होणारा भाग युरोप होता. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा वसंत ऋतूच्या सुरुवातीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने युरोपाला ठोठावले आहे. इटली, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, बेल्जियमसह युरोपात कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या देशांमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या तुलनेत सध्या संसर्ग दर सर्वोच्च पातळीवर आहे. संपूर्ण युरोपात गेल्या आठवड्यात ८ लाख नवे रुग्ण आढळले. हे त्याच्या मागील आठवड्याच्या तुलनेत ५.८ टक्के जास्त आहेत. यासाठी कोरोनाच्या नव्या स्वरूपाला जबाबदार धरले जात आहे. वाढते रुग्ण बघून बहुतांश देशांनी लॉकडाऊन आणि प्रतिबंध वाढवणे सुरू केले आहे. दुसरीकडे, वाढत्या रुग्णांबरोबर युरोपात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसींचा ४.८५ लाख डोस देत अमेरिका, ब्रिटन, चीनच्या तुलनेत युरोप लसीकरणात खूप मागे पडला आहे. जगात रुग्णांची संख्या १२ कोटींच्या पुढे गेली. मागील २४ तासांत जगात ३.५९ लाख नवे बाधित आढळले.

इटली : गेल्या वर्षी काय झाले त्याची आठवण आहे, रोखण्याचे प्रयत्न : पीएमइटलीत सोमवारपासून जवळपास संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आला. केवळ आवश्यक कामांसाठी घरातून बाहेर निघायला सूट आहे. गेल्या आठवड्यात इटलीत रोज २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इटली सर्वाधिक प्रभावित झाला होता. पंतप्रधान मारियो ड्रागी यांनी वाढत्या रुग्णांबाबत म्हटले आहे, गेल्या वर्षी काय झाले होते त्याच्या आठवणी ताज्या आहेत. पुन्हा ते होऊ नये म्हणून आम्ही शक्य ते प्रयत्न करू. युराेपात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या एक वर्षानंतर म्हणजे वसंतमध्ये तिसरी लाट आली आहे. ५.८% दराने मागील आठवड्यात नवे रुग्ण आढळले.

फ्रान्स : दर १२ व्या मिनिटाला पॅरिसमध्ये एक रुग्ण आयसीयूत होतोय दाखल
फ्रान्समध्ये डिसेंबर २०२० मध्ये वेगाने कोरोना रुग्ण घटले होते. मात्र, जानेवारीनंतर त्यात खूप वाढ झाली. स्थिती एवढी बिघडली की राजधानी पॅरिसमध्ये आयसीयू जवळपास भरले आहेत. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिविअर वेरन यांनी सांगितले, दिवसा व रात्री प्रत्येक १२व्या मिनिटाला पॅरिसचा एक जण आयसीयूत दाखल होत आहे. फ्रान्सच्या अनेक भागात लॉकडाऊन लागला आहे. देशव्यापी लॉकडाऊन लावण्यासाठी डॉक्टर दबाव टाकत आहेत.

आमच्या देशात लसीकरण वेगात होत असले तरी मास्कची सक्ती हटवणे धोकादायक आहे. आता हलगर्जीपणा करणे नवीन धोका आणणे ठरेल. ४ जुलैनंतर लाेकांना खूप सूट मिळेल- -अँथनी एस. फौसी, अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य आजारतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...