आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्वास थांबल्यानंतरही इहलोकात राहण्याची अनेकांची इच्छा असते. अशाच प्रकारची इच्छा अमेरिकेतील इंडियाना राज्यातील नागरिकांमध्ये दिसून येते. या इच्छापूर्तीसाठी त्यांनी वेगळा मार्ग शाेधला आहे. मृत्यूनंतर दहन संस्कार केला जाताे आणि त्यानंतर राहणाऱ्या राखेला समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळयुक्त कृत्रिम खडकावर संरक्षित केले जात आहे. काही काळानंतर या खडकावर आजूबाजूला जलीय वनस्पती उगवतात तसेच जलचर प्राणीही तेथे येऊ लागतात. त्यातून नवी इकाे सिस्टिम तयार हाेऊ लागते. अशा प्रकारे माणूस दुसऱ्या रूपाने पृथ्वीवर राहताे. इंडियानातील लाेक अशा प्रकारे याच जगात राहण्यासाठी आपल्या वारसापत्रात अशा प्रकारची इच्छाही नमूद करू लागले आहेत.
अशीच इच्छा व्यक्त करणाऱ्यांमध्ये दंत चिकित्सक व प्राेफेसर जेनेट हाॅक यांचाही समावेश हाेताे. २०२० मध्ये डाॅक्टर हाॅक यांनी सागर तळाशी अंत्यसंस्काराची इच्छा व्यक्त केली. मृृत्यूनंतर माझ्या अवशेषांचा एक खडक तयार केला जावा. त्यांची इच्छा जाहीर करण्यात आल्यानंतर इंडियानामध्ये अशाच प्रकारच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी फ्लाेरिडाच्या इटर्नल रीफ कंपनीने पुढाकार घेतला. त्यासाठी कंपनी ३ हजार ते ७५०० डाॅलर (सुमारे २.२५ लाख ते ५.५ लाख रुपये) एवढा माेबदला घेऊन नाेंदणी करू लागली आहे. महामारीत अशा प्रकारच्या अंत्यसंस्काराची मागणी तीनपटीने वाढली आहे. कंपनीचे प्रतिनिधी नातेवाइकांशी संवाद साधून कबरीची माहिती देतात. त्यामुळे नातेवाइकांना कधीतरी त्या ठिकाणाला भेट देता येऊ शकेल.
टेक्सासपासून न्यूजर्सीपर्यंत ३ हजार स्मारकांचे खडक
दाेन कंपन्या इटर्नल रीफची सेवा देऊ लागल्या आहेत. खडकाची उंची एक मीटर आणि २ मीटर रुंद असते. या संस्थेने टेक्सास ते न्यूजर्सीपर्यंत २५ ठिकाणी सुमारे तीन हजार खडकाची स्मारके तयार केली आहेत. ते १६ एकर क्षेत्रात २५ लाख स्मारके तयार करू इच्छितात. एकूण हा जगातील सर्वात माेठा प्रवाळयुक्त खडकाचा भाग ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.