आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेसह सहा देशांत काेराेना विषाणूचा नवा स्ट्रेन समाेर आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. नव्या प्रकारच्या विषाणूचा आधीच्या तुलनेत ७० ते १०० टक्के वेगाने फैलाव हाेईल, असे मानले जाते. ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील आकडे त्याला दुजाेरा देतात. नाेव्हेंबरच्या अखेरच्या दिवसांच्या तुलनेत ब्रिटनमध्ये डिसेंबरमध्ये आतापर्यंत तीन दिवसांतील सरासरी बाधितांचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. दक्षिण आफ्रिकेतही त्यात वाढ झाली आहे. ३० नाेव्हेंबरला ब्रिटनमध्ये नवे काेराेनाबाधित रुग्ण तीन दिवसांत सरासरी १३,४५२ होते. २२ डिसेंबरला हा आकडा ३५,३६५ झाला. दक्षिण आफ्रिकेत ३० नोव्हेंबरला तीन दिवसांत सरासरी २६८८ एवढा आकडा झाला. २२ डिसेंबरला हा आकडा ९,२४५ झाला. या दोन्ही देशांत याच कालावधीत मृतांच्या संख्येतही वाढ झाली. ३० नोव्हेंबरला तीन दिवसांत सरासरी २९९ जणांचा मृत्यू झाला होता. २२ डिसेंबरला हा आकडा ४११ झाला. दक्षिण आफ्रिकेत ३० नोव्हेंबरला सरासरी ५३ जणांचा मृत्यू झाला. २२ डिसेंबरला तो २३६ वर पोहोचला. ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त नेदरलँड, इटली, डेन्मार्क व ऑस्ट्रेलियात विषाणूचे नवे स्ट्रेन मिळाले आहेत. डेन्मार्क, नेदरलँड्समध्येही नव्या केस व मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. इटलीत मात्र दोन्ही श्रेणीतील आकड्यांत घट झाली आहे. ऑस्ट्रेलियात त्याचा फार प्रभाव पडलेला नाही.
नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी प्रवासबंदीवर तज्ञ नाहीत सहमत
कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आल्यानंतर सगळे देश ब्रिटन प्रवासावर बंदी घालू लागले आहेत. परंतु प्रवासबंदीमुळे कोरोनाचा संसर्ग थांबवता येणार नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जर्मनीचे टुबिगेन विद्यापीठाचे संचालक डॉ. पीटर क्रेम्सनर म्हणाले, ट्रॅव्हल बॅन हा मूर्खपणा आहे. नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये असेल तर ही गोष्ट समजू शकते. परंतु तो आधीच अनेक देशांत पसरला आहे. ब्रिटनमध्ये अत्युच्च जिनोमिक निगराणी यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये नवा स्ट्रेन दिसून आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.