आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • New Trend Regarding Dating In Singles Survey Corona Changed The Attitude Of Single People In America

वॉशिंग्टन:कोरोनाने अमेरिकेत अविवाहितांचा दृष्टिकोन बदलला; ते आपल्या दिसण्याबाबत निष्काळजी झाले, भावनात्मक परिपक्वतेला प्राधान्य

वॉशिंग्टन / कॅडी लँग23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कोरोना महामारीनेे अविवाहितांचे विचार अनेक बाबतीत पूर्णपणे बदलून टाकले आहेत. आता ते शारीरिक आकर्षणाऐवजी भावनात्मक आणि स्थायित्वाला अधिक प्राधान्य देत आहेत. डेटिंग साइट मॅचद्वारे राेमांटिक संबंधांविषयी करण्यात आलेल्या ११ व्या वार्षिक सर्व्हे २०२१ नुसार आता इतर सर्व गुणांपेक्षाही अधिक प्राधान्य भावनात्मक परिपक्वतेला दिले जात आहे. कोरोना महामारीमुळे डेटिंगच्या ट्रेंड्समध्ये अनेक प्रकारचे बदल समोर आले आहेत. अमेरिकेत हे सर्वेक्षण १८ ते ९८ वर्षांच्या लोकांवर करण्यात आले.

सर्वेक्षणानुसार, आता एकाकी लाेक पूर्वीसारखे शारीरिकरीत्या आकर्षक जोडीदार शोधत नाहीत. त्याऐवजी दीर्घकाळ साथ देणाऱ्या जोडीदाराचा शोध घेत आहेत. या सर्वेक्षणात सहभागी ८३% लोकांना मोकळे विचार आणि मतभेद स्वीकारू शकणारा जोडीदार हवा आहे. तर ८४% म्हटले की, जर जोडीदार संवादकर्ता असेल तर अधिक चांगले होईल. २०२० मध्ये झालेल्या अशाच एका सर्वेक्षणात सहभागी ९०% लोकांनी जोडीदाराचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे शारीरिक आकर्षण सांगितले होते. तर २०२१ च्या सर्वेक्षणात हा आकडा घटून ७८% राहिला. ७३% लाेकांनी मान्य केले की, ते मागील वर्षीच्या तुलनेत प्राधान्यावर चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ही बाब केवळ रोमांटिक संबंधांविषयीच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याशीही निगडित आहे.

मॅचच्या मुख्य शास्त्रीय सल्लागार हेलेन फिशर यांचे म्हणणे आहे की, आम्ही कोणत्या प्रकारे डेट करतो आणि कसे संबंध निर्माण करतो त्याला कोरोना प्रभावित करू शकतो. त्यामुळेच हा कल पुढे आला आहे. हा मानवी संबंधांचा ऐतिहासिक काळ आहे. ‘वन नाइट’ विचारांचे तरुण घटले. महामारीनंतर सुरक्षा आणि स्थायिक होण्याची गरज वाटणाऱ्यांत वाढ झाली आहे. वित्तीय स्थैर्य असलेल्या जोडीदाराची अपेक्षा असणारे युवक दोन वर्षांत २० % वाढले. तसेच समान शिक्षण घेतलेला जोडीदार हवा म्हणारे १०% तरुणही वाढले.

जोडीदाराविषयीची उत्सुकता वाढली, सुंदर नव्हे स्थायिक जोडीदाराचा शोध
सर्वेक्षणात सहभागी एकलकोंडे लोकांना लवकरात लवकर जीवनसाथी हवा आहे. केवळ ११% लोकच टाइमपाससाठी डेटिंग करू इच्छितात. पण, ६५% नी सांगितले की, ते एका वर्षात जोडीदार निश्चित करू इच्छितात. ६२% लोकांनी सांगितले की त्यांना नात्यात कटिबद्ध राहणारा जोडीदार हवा आहे. न्यूयाॅर्क सिटीतील डेटिंग कंपनी लिसा क्लॅमपिट मॅचमेकिंगच्या अध्यक्षा लिसा क्लॅमपिट यांच्या मते महामारीने लोकांना थांबण्याचा आणि वास्तवात त्यांना काय हवे आहे, याचा विचार करण्याची संधी दिली आहे. यामुळेच आता सुंदरतेपेक्षा स्थायी जोडीदाराचा शोध वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...