आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • New Virus In China | Chinese Scientists Have Found Strain Of Swine Flu Virus That Could Cause An Epidemic

चीनकडून नवीन धोक्याची भीती:चिनी डुकरांमध्ये सापडला फ्लूचा नवीन व्हायरस, यामुळे कोरोना व्हायरससारखी महामारी येऊ शकते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिनी शास्त्रज्ञांनी व्हायरसला G4 EA H1N1 नाव दिले, हा 2009 मध्ये आलेल्या स्वाइन फ्लू सारखा

चिनी वैज्ञानिकांनी फ्लू विषाणूचा स्ट्रेन शोधून काढला ज्यामुळे साथीचा रोग येऊ शकतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, फ्लू विषाणूचा एक स्ट्रेन नुकताच डुकरांमध्ये आढळला आहे, जो मानवांना संक्रमित करू शकतो. हा फ्लू त्याचे स्वरूप बदलून (म्यूटेट) एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये संसर्गित होऊन जागतिक महामारी आणू शकतो.

डुकरांवर लक्ष ठेवण्याची गरज 

या विषाणूचे नाव G4 EA H1N1 आहे. यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे की, ही आणीबाणी सारखी समस्या नाही मात्र यामध्ये अशी लक्षणे दिसली जी मानवाला संसर्गित करू शकतात. यामुळे यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रोसेसिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मते, हे नवीन स्ट्रेन आहे, म्हणून लोकांमध्ये याच्याशी लढण्याची क्षमता कमी असू शकते किंवा नसूही शकते. यापासून बचावासाठी डुकरांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. 

हा व्हायरस पसरला तर थांबविणे कठीण होईल

जगात कोरोना व्हायरसपूर्वी 2009 मध्ये स्वाइन फ्लू साथीचा रोग आला होता. मेक्सिकोतून निघालेला स्वाइन इतका घातक नव्हता, जेवढा त्याबद्दल अंदाज बांधला होता. यावेळी कोरोना व्हायरसमुळे 1 कोटींपेक्षा अधिक लोक संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थिती जर नवीन व्हायरस पसरला तर याला थांबविणे कठीण होईल. 

व्हायरसकडे मानवांमध्ये आपली संख्या वाढवण्याची पुरेशी क्षमता

व्हॅक्सीनद्वारे फ्लूचा व्हायरस A/H1N1pdm09 ला लोकांपासून दूर ठेवण्यात आले, परंतु चीनमध्ये याचा जो नवीन स्ट्रेन पाहिला गेला तो 2009 मध्ये महामारी पसरवणाऱ्या स्वाइन फ्लूशी मिळताजुळता आहे. संशोधक किन-चो चेंग नुसार, नवीन स्ट्रेन G4 EA H1N1 मानवाच्या श्वसननलिकेत जाऊन आपल्या कोशिकांची संख्या वाढवू शकतो. असे करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे.