आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 देशांत युद्धाच्या सावटात नववर्षाचे स्वागत:युक्रेनच्या सैनिकांनी हल्ल्यात गायले गीत, नाइट कर्फ्यूपूर्वी उडवल्या सुरसुऱ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या जगात नववर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. पण जगातील काही देशांतील नागरिकांवर स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेण्याची वेळ आली आहे. युक्रेनपासून रशियापर्यंत, इस्त्रायलपासून पॅलेस्टाइनपर्यंत, तसेच अझरबैझानपासून आर्मेनियापर्यंतचे लोक युद्धाच्या सावटाखाली आयुष्य कंठत आहेत.

अशाच 6 देशांतील नववर्षाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक फोटो पाहा...

गाझा सिटीतील नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी एका व्यक्तीने पॅलेस्टिनी मुलीच्या चेहऱ्यावर 2023 पेंट केले.

इस्त्रायलसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनमध्ये नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हे छायाचित्र 2023 च्या 3 दिवस अगोदरचे आहे. इस्त्रायली लष्कराने पॅलेस्टाईनच्या अल खलीलमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तेव्हा येथील एका शाळेतील विद्यार्थी आपल्या घरी निघाले होते. डोळ्यापुढे धूर व लोकांची धावपळ पाहून हे विद्यार्थी घाबरून रस्त्यावर रडत पळताना दिसून आले.

युक्रेनमधील हा 42 वर्षांचा सैनिक 31 डिसेंबर रोजी कीव्हमध्ये पोहोचला, तेव्हा रेल्वेस्थानकावर आपल्या मुलीला पाहून भावूक झाला. त्याने आनंदाने तिला उचलून घेतले.

कीव्हमधील रस्त्याशेजारच्या भीतींना सजवण्यात आले आहे. युद्धात अनेकांनी आपले प्राण गमावले. लाखोंना फटका बसला. त्यामुळे या भींतीवर मुलांनी युद्ध पाहू नये, असा संदेश लिहिण्यात आला.

युक्रेनचा 27 वर्षीय सैनिक पावलो प्रझेहोडस्कीने युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात रशियन हल्ल्याच्या सावटात युद्धगीत गायले.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला युक्रेनची राजधानी कीव्हमधील अनेक रहिवाशांनी रात्रीच्या कर्फ्यूच्या आधी सुरसुऱ्या पेटवल्या.

युक्रेनच्या सैनिकानी मिलिट्री रेस्ट हाउसमध्ये नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला.

कीव्ह सेंट्रल स्क्वेयरवरील या छायाचित्रात नागरिक युद्धात मारले गेलेल्या आपल्या आप्तस्वकियांना व सैनिकांना श्रद्धांजली वाहताना दिसून येत आहेत.

हे छायाचित्र रशियाची राजधानी मॉस्कोच्या गोर्की पार्कचे आहे. येथे सैनिक युद्धाचे सिंबल 'Z'पुढे उभा आहे. हे सैनिक नववर्षाच्या वेळी आपल्या कुटुंबीयांपासून दूर आहेत.

हा फोटो मॉस्कोमधील सेंट कॅथेड्रलसमोरील रेड स्क्वेअरचे आहे. येथे नवीन वर्षाच्या स्वागतार्थ राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक उभे आहेत. रशियाच्या लोकांना युद्धाचा फारसा फटका बसला नाही.

गाझा शहरात नवीन वर्ष साजरे करण्यापूर्वी पॅलेस्टिनी कुटुंब 2023 च्या साइन बोर्डजवळ सेल्फी घेताना.

गाझा पट्टीतील फतह पार्टीचा 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शनिवारी हजारो पॅलेस्टिनी नागरिक गाझा सिटी पार्कमध्ये जमले होते. हा परिसर हमास या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला आहे.

जेरुसलेमजवळील ऑलिव्ह पर्वतावर नवीन वर्ष साजरे करणारे हे नागरिक.

नागोर्नो काराबाखवरून आर्मेनिया-अझरबैजानमध्ये वाद आहे. तणावाच्या स्थितीत आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनियन यांनी संरक्षण मंत्री सुरेन पापिक्यान यांच्यासह सैनिकांसोबत नवे वर्ष साजरे करण्यासाठी सीमाभागाचा दौरा केला.

हे छायाचित्र अझरबैजानच्या मुख्य वैद्यकीय रुग्णालयाचे आहे. येथे माजी राष्ट्राध्यक्ष हैदर अलीयेव यांचे स्मारक आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी येथे मानवंदना देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले. अझरबैजानी लोक नवीन वर्ष एकता दिवस म्हणून साजरे करतात.

बातम्या आणखी आहेत...