- Marathi News
- International
- New Year Celebrations 2023 Updates; New Year Booms Around The World | New Year Celebration In Myanmar
नववर्षाचे जगभरात जंगी स्वागत:म्यानमारने 4 तासांसाठी कर्फ्यू हटवला; रशियन अंतराळवीरांनी अवकाशात उत्सव साजरा केला
संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. लष्करशासित असलेल्या म्यानमारमध्येही 2023 चे स्वागत करण्यासाठी 4 तासांसाठी कर्फ्यू हटवण्यात आला. लष्करातील लीक झालेले पत्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून ज्यामध्ये असे लिहिले आहे की, लोक नवीन वर्ष साजरे करू शकतील. यासाठी चार तासांचे निर्बंध हटविण्याचे सांगण्यात आलेले आहे.
दरम्यान, रशियन अंतराळवीरांनी देथील अवकाशात नववर्षाचा उत्सव साजरा केला आहे. तीन रशियन अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव्ह, अण्णा किकिना आणि दिमित्री पेटलिन यांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सजवले होते. तर आपण जाणून घेऊया विविध देशात नववर्षाचे स्वागत कसे करण्यात आले आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरातील सर्वात प्रसिद्ध स्काय टॉवर चमकणाऱ्या दिव्यांनी सजवण्यात आला होता.
नवीन वर्षाचा सोहळा पाहा फोटोंमध्ये...
बँकॉक, थायलंडमध्ये नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान पहाटेवेळी मंदिर परिसर प्रकाशमय झाले
ऑकलंडचा सर्वात प्रसिद्ध स्काय टॉवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी सजवण्यात आला होता.
चीनच्या वुहानमध्ये कोरोनाच्या कहरात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात रशियाच्या अंतराळवीरांनी शून्य गुरुत्वाकर्षणात देखील नववर्षाचे स्वागत केले.
रात्री 12 वाजता हाँगकाँगमधील व्हिक्टोरिया हार्बरवर फटाक्यांची आतषबाजी.
सिडनी हार्बर ब्रिजजवळ 7,000 हून अधिक लाईटिंग करण्यात आली होती. ऑपेरा हाऊसजवळ 2,000 हून अधिक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन पाहण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिजभोवती हजारो लोक जमले होते.
2022 च्या शेवटच्या दिवशी न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरवरही लोकांची गर्दी दिसून आली. येथे सर्व लोक नवीन वर्ष सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
इंडोनेशियातील देनपसार शहर सांस्कृतिक परेडसह नवीन वर्षाचे स्वागत करते. हा फोटो पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या नर्तकांचा आहे.
चीनमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमध्ये लोक मास्क लावून नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. रस्त्यांवर येथे सजावट करण्यात आलेली आहे.